{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

संगमनेर । झुंझार न्यूज

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा राज्याचे माजी शिक्षण व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशासाठी दिशादर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेअर्स पूर्ण असलेल्या सभासदांना 30 किलो मोफत साखरचे वितरण सुरू झाले आहे.

कारखाना गोडाऊन मध्ये व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, संचालक संपतराव गोडगे, सौ.लताताई गायकर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, कार्यालयीन अधीक्षक कृष्णा दिघे, भाऊसाहेब खर्डे, शेखर वाघ, ॲड.बाबासाहेब गायकर यांच्या उपस्थितीमध्ये संचालकांना मोफत साखर वितरण सुरू करण्यात आले.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली थोरात कारखान्याने कायम सभासद, शेतकरी,ऊस उत्पादक कामगार यांचे हित जोपासले आहे. दिवाळीनिमित्ताने कार्यक्षेत्रातील उसासाठी 200 रुपये अनुदान दिले असून कामगारांना 20% बोनस व तीस दिवसांचे सानूगृह अनुदान आहे.

तर 30 सप्टेंबर 2026 अखेर शेअर्स पूर्ण असलेल्या सर्व सभासदांना 30 किलो मोफत साखर वाटप करण्यात आली आहे. गोडाऊन क्रमांक 12 व 13 मध्ये तीन दिवस सुरू राहणार आहे.

यावेळी बोलताना पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, कारखान्याने कायम सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,सभासद यांचा विचार केला आहे. दिवाळीच्या निमित्ताने कारखान्याने 1 लाख मे.टनाचे गाळपही आज पूर्ण केले असल्याने हा आनंदाचा दिवस आहे. यामध्ये सर्वांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे हि ते म्हणाले. तर सभासदांनी आपली साखर कारखाना कार्यस्थळावर येऊन घेऊन जावे असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.

याप्रसंगी कृष्णा दिघे यांनी सर्वांचे आभार मानले. दिवसभरात विविध गावांमधील सभासदांनी साखर नेण्यासाठी मोठी गर्दी केली असून सर्वांना अत्यंत नम्रतेने आणि आदरपूर्वक वागणूक व सन्मान यामुळे सर्व सभासद भारावून गेले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *