{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पशुधनाच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील सायखिंडी फाटा येथील श्री जीवदया मंडळ पांजरापोळ गोशाळेला नुकतीच भेट दिली. यावेळी गोशाळेतील जनावरांची देखभाल, आरोग्य आणि चारा व्यवस्थापनाची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच सर्वात चांगली गोशाळा तुमची आहे, अशा शब्दांत त्यांनी गोशाळेच्या कामाचे कौतुक केले.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध व्हावा आणि जनावरांची योग्य देखभाल व्हावी, यासाठी आयुक्त डॉ. पाटील यांनी गोशाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी गोशाळेतील लहान-मोठ्या जनावरांची पाहणी केली.

जनावरांच्या आरोग्याची, तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या चारा-पाण्याच्या व्यवस्थेची माहिती घेतली. गोशाळेचे अध्यक्ष राजेश दोषी यांच्याकडून सध्या उपलब्ध असलेला चारा, त्याची साठवणूक आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

उपलब्ध असलेल्या चाऱ्याचे योग्य नियोजन करून त्याची व्यवस्थित साठवणूक करावी. भविष्यात चाराटंचाई निर्माण होणार नाही, याची आतापासूनच काळजी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. गोशाळेतील जनावरांची उत्तम देखभाल आणि त्यांच्या आरोग्याची स्थिती पाहून आयुक्तांनी समाधान व्यक्त केले, तसेच गोशाळेच्या व्यवस्थापनाचे कौतुक करत सर्वात चांगली गोशाळा असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.


श्री जीवदया मंडळ पांजरापोळ गोशाळेत सध्या लहान-मोठ्या मिळून पंधराशेहून अधिक जनावरांचे संगोपन केले जात आहे. जनावरांना वेळेत आणि दर्जेदार पशुवैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी गोशाळेत पुढील महिन्यात अत्याधुनिक पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जनावरांवर आवश्यक उपचार गोशाळेच्या परिसरातच करणे शक्य होणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध चाऱ्याचे योग्य नियोजन आणि साठवणूक करण्यावरही आम्ही विशेष लक्ष देत आहोत


.
राजेश दोषी, अध्यक्ष, श्री जीवदया मंडळ, पांजरापोळ गोशाळा*

यावेळी गोशाळेचे अध्यक्ष राजेश दोषी, जिल्हा पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉक्टर पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर दशरथ दिघे, तालुका, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रदीप खेडेराव आदी उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *