{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

विविध रस्त्यांचे डांबरीकरण होणार

 

 

संगमनेर | झुंजार न्यूज

 

राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामांसाठी जिल्हा वार्षिक योजना 2024- 25 अंतर्गत ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण योजनेतून विविध रस्त्यांच्या डांबरीकरण व मजबुतीकरणासाठी 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाले असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यात 171 गावे व 248 वाड्या वस्ती आहेत. या सर्व गावांमध्ये आमदार थोरात यांच्या माध्यमातून सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2024- 25 अंतर्गत ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरणासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून 3 कोटी 50 लाखांचा निधी मिळाला आहे.

 

 या अंतर्गत अंभोरे येथील अंभोरे ते पिंपळगाव देपा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी 49 लाख 99 हजार रुपये, तिगाव मधील तीगाव ते शिवापूर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी 29 लाख 98 हजार रुपये, निमगाव बुद्रुक येथील निमगाव बु ते सावरचोळ रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी 29 लाख 99 हजार रुपये, पठार भागातील शेंडेवाडी येथील शेंडेवाडी ते सतीचीवाडी ,डोळसणे गावास जोडणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण व सीडी वर्क या कामासाठी 39 लाख 99 हजार रुपये, तसेच करूले येथील करुले ते कांदळकर वस्ती रस्ता मजबुतीकर व डांबरीकरण कामासाठी 19 लाख 98 हजार रुपये,

 

कोकनेवाडी येथील पिंपळगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी 49 लाख 99 हजार रुपये, तळेगाव मधील तळेगाव ते धनगर वाडा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी 19 लाख 99 हजार रुपये, वडझरी बुद्रुक मधील वडझरी ते रांजणगाव रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण कामासाठी 19 लाख 98 हजार रुपये, सायखिंडी मधील निमगाव भोजापूर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी 19 लाख 99 हजार रुपये, तर पठार भागातील खरशिंदे मधील खरशिंदे ते खांबे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी 29 लाख 99 हजार रुपये असे एकूण 3 कोटी 49 लाख 92 हजार 361 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

 

या निधीमधून सदर गावांमधील रस्त्यांची मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम होणार आहे. त्यामुळे तालुक्यात अधिक मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होणारा असून या रस्त्यांच्या कामासाठी निधी दिल्याबद्दल करूले, कोकणेवाडी, तळेगाव, मेंढवण ,वडझरी, सायखिंडी, खडशिंदे ,अंभोरे, तिगाव, निमगाव ,शेंडेवाडी या गावांमधील नागरिकांनी  काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या आभार व्यक्त केले आहे

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *