{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

पानोडी l झुंजार न्यूज

 

 

 

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील कु.सम्रता एकनाथ सोनवणे या विद्यार्थीनींनी पुणे येथे राज्यस्तरीय योगा स्पर्धेमध्ये पहिला नंबर पटकावून गोल्ड मेडल सर्टिफिकेट व ट्रॉफी मिळवत आता तिची निवड भारत देशात होणाऱ्या स्पर्धेसाठी झाल्याने तिचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे .

 

 

कु . सम्रता हिची देशपातळीवरील योगा स्पर्धेसाठी निवड होवून ही स्पर्धा जयपुर येथे होणार असून या स्पर्धेत विजय मिळविल्यास या स्पर्धेसाठी निवड झाल्यास पुढील योगा स्पर्धा ही अंतरराष्ट्रीयस्तरावरील  कॅनडा या देशात होणार असून  भारत देशासाठी योगा स्पर्धा खेळणारी कु सम्रता ही पहिला ग्रामिण विदयार्थीनी असेल . कु . सम्रता या मुलीने आत्तापर्यंत झालेल्या योगा स्पर्धेमध्ये गाव , तालुका , जिल्हा व राज्य पातळीवर पहिला क्रमांक मिळविला यातून अनेक मेडल व ट्रॉफी तिने मिळविल्याने तिचे कौतुक होत आहे . कु . सम्रता हिला बालपनापासून योगामध्ये आवड निर्माण होवून आपल्या आई – वडीलासह कुटुंबाला प्रत्येकांनी प्रोत्साहन दिल्यानेचं तिची इच्छा – आकांक्षा बहरत गेल्याने विविध स्पर्धेमधून आपले कलागुण दाखवून दिले .

 

 

नुकत्याचं झालेल्या पुणे येथे राज्यस्तरिय योगा स्पर्धेत आपले प्राविण्य दाखवत कु सम्रता हिने प्रथम क्रमाक मिळविला असून देशातंर्गत होणाऱ्या योगा स्पर्धेमध्ये कु . सम्रता हीची निवड झाली असून ही स्पर्धा जयपुर येथे होणार असून पुढील स्पर्धेकरिता तिचे सर्व स्तरावरुन व । ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे .

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed