{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

शिर्डी l झुंजार न्यूज 

होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरोधात महा आघाडी अशीचं लढत होणार असून लाडकी बहीण योजनेसह विविध लोकहित निर्णय महायुती सरकारने घेतल्याने महाराष्ट्र राज्याचा निकाल सुध्दा हरियाणा प्रमाणे लागून  महायुती १७० जागा जिकून सत्तेवर येणारा असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना . रामदास आठवले यांनी व्यक्त केला .
विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ना रामदास आठवले संगमनेर , शिर्डी , राहुरी येथे आले असता झालेल्या पत्रकार संवादातून ना . रामदास आठवले बोलत होते यावेळी विजयराव वाकचौरे , श्रीकांत भालेराव , सुरेंद्र थोरात , रमेश मकासरे , सुनिल साळवे , दिपक गायकवाड , पप्पू बनसोडे , रमेश शिरकांडे , चांगदेव जगताप , सुभाष त्रिभुवन , नाना त्रिभुवन आदिसह जिह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी ना रामदास आठवले पुढे म्हणाले की , अनेक वर्षाच्यापासून नगरशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहे २००९ ला शिर्डी लोकसभा आरक्षित झाल्याने येथील नेत्याच्या आग्रहखातर कॉग्रेसकडून मी निवडणुक लढविली . मात्र अट्रोसिटी खोटा प्रचार करुन माझा पराभव करण्यात आला होता आता ही २०२४ ला मी महायुतीकडून इच्छुक होतो मात्र रिपाईला जागाचं न दिल्याने महायुतीला नगरच्या दोन्ही जागा गमवाव्या लागल्या .  
रिपाई पक्ष हा देशांच्या काना कोपऱ्यात पसरला असून कार्यकर्ताची फळी मजबूत आहे मात्र सत्ता मिळविण्याकरिता ऐक्याची गरज आहे प्रकाश आंबेडकरांनी समाज्याच्या हिताकरिता एकत्र येण्याचा पुढाकार घेतल्यास आपण सुध्दा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करुन १९९८ चा ही ऐक्य झाल्याने समाज्याचे ४ खासदार निवडून आले होते असे ही उदाहरण देत आठवले म्हणाले की , २००९ ला  आंबेडकरविना रिडलोस प्रयोग केला मात्र फेल गेला तेव्हा समाज्याकरिता एकत्र या असे आवाहन आठवले यांनी केले  
आता विधानसभेला श्रीरामपूरसह किमान ८ जागा दयाव्यात त्या शिवाय राज्यपालनियुक्ती आमदारकी , महामंडळाचे अध्यक्षपद , संचालक असे कार्यकर्त्यांना सत्तेच्या प्रवाहात घ्यावे अशी मागणी करत महायुतीमध्ये शिंदे – पवार आल्यापासून रिपाईला कुठल्याबाबत विचारात न घेता शासन आपल्या दारात , रिपाई कार्यकर्ते घरात हे महायुतीचे धोरणावर रामदास आठवले यांनी खंत व्यक्त केली . तर शेतकऱ्याप्रमाणे महामंडळाचे सुध्दा कर्ज महाराष्ट्र सरकारने माफ करावे यांचा सुध्दा मोठा फायदा महायुतीला होईल असा सल्ला सुध्दा आठवले यांनी दिला .
लोकसभेत संविधान व मराठा आरक्षण बाबत अप्रचार झाल्याने महायुतीला मोठा फटका बदला मात्र विधानसभा निवडणुकीत राजकिय परिस्थिती बदल झाला शिंदे – फडणवीस – पवार सरकार धमाकेदार लोकहित बाबत निर्णय घेतल्याने जरांगे फक्टर चालणार नसल्याने १७० जागा आम्ही घेणार .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *