हिवरगाव पावसा येथे विराट सभा
संगमनेर | झुंजार न्यूज
जनतेच्या प्रेमामुळे राज्यात आणि देशात काम करण्याची संधी मिळाली. या संधीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी केला. निळवंडे धरण व कालवे पूर्ण करून पाणी दिले. ज्या लोकांनी अडथळे निर्माण करणे ते इथे येऊन विकासाच्या बाता मारत आहेत. तुम्ही 35 वर्षात काय केले हे अगोदर सांगा. तुमचे खोटे बोलणे संपूर्ण राज्याने पाहिले असून मागील अडीच वर्षात तुम्ही तालुक्याचा तुम्ही छळ केला .पालकमंत्री हा मालक नसतो असे सांगताना तुमची दडपशाही इकडे चालणार नाही असा इशारा काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे

हिवरगाव पावसा येथे प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी सिताराम पावसे होते तर व्यासपीठावर डॉ जयश्रीताई थोरात ,रणजितसिंह देशमुख, रामदास पाटील वाघ, गणपतराव सांगळे ,रमेश गुंजाळ, डॉ प्रमोद पावसे ,नवनाथ आरगडे, शिवसेनेचे संजय फड, अशोक सातपुते ,संतोष मांडेकर, सौ अर्चनाताई बालोडे, कैलास वाकचौरे ,दिलीप साळगट आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेरच्या जनतेने कायम प्रेम केले म्हणून राज्यात काम करण्याची संधी मिळाली. राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या समन्वयाची मोठी जबाबदारी होती. मी राज्यभर फिरत होतो मतदारसंघ कार्यकर्त्यांनी सांभाळला. ज्यांना चाळीस वर्षात त्यांचा रस्ता नीट करता आला नाही. ते इकडे येऊन विकासाच्या गप्पा मारत आहेत .तुमचे वडील इकडे खासदार होते तुम्ही 35 वर्षात काय केले हे पहिले सांगा इकडे येऊन वाईट बोलले संगमनेर तालुका कुणाच्या वाटेला जात नाही आणि कुणी आमच्या वाटेला गेले तर सोडत नाही.

।

तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात हे राज्यात काम करतात. मी तालुक्यात जनतेत फिरले. मी काय चूक केली .माझ्याविरुद्ध बोलले त्यामुळे संपूर्ण तालुका पेटून उठला.यात माझे भाऊ माझ्या मागे उभा राहिले. तर त्यांच्यावर 307 चे गुन्हे दाखल केले. हा कुठला अन्याय आहे, मी आठ तास पोलीस स्टेशन बाहेर उभी होती. मात्र माझी केस घेतली गेली नाही. उलट माझ्यावरच केस टाकली . ही दडपशाही आपण हे सहन करायचे नाही. सर्वांनी वीस तारखेला एकजुटीने मोठ्या मताधिक्याने आमदार थोरात यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले
यावेळी विविध कार्यकर्त्यांनी आपली मनोगती व्यक्त केली.
तालुक्याच्या अस्मितेला जेव्हा धक्का लागतो तेव्हा तालुका पेटवून उठतो
धांदरफळ मध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ दहा मिनिटात सर्व तालुका रस्त्यावर आला. महिला भगिनी स्टेजवर चढल्या. पाचशे महिला आणि हजारो पुरुष रात्रभर पोलीस स्टेशन समोर बसून राहील. जे रक्षणार्थ आले .त्यांच्यावर ३०७ चे कलम दाखल केले गेले .कुणी ऍडमिट नाही, कोणी केस दिली नाही. आणि हाफ मर्डरच्या केसेस दाखल होतात. हे प्रशासन कुणाच्या दबावाखाली आहे असा सवाल त्यांनी करताना सगळी दुरुस्ती केली जाईल असेही ते म्हणाले.

