विकासाला खो घातल्याने तरुणांमध्ये मोठा असंतोष
संगमनेर । झुंझार न्यूज
नाशिक – पुणे या शहरांना जोडणाऱ्या हाय स्पीड रेल्वे मार्गामुळे संगमनेर सह या विभागाच्या विकासासाठी ऐतिहासिक काम होणार होते. यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून भूसंपादन होऊन शेतकऱ्यांना 500 कोटी पेक्षा जास्त रकमा देण्यात आल्या. मात्र सत्ता बदल झाल्यानंतर राजकारणासाठी हा मार्ग पळवल्याने संगमनेरच्या विकासाला मोठा खो बसणार असून यामुळे शिक्षण घेणाऱ्या व नोकरी करणाऱ्या तरुणांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

नाशिक – पुणे – मुंबई हा गोल्डन ट्रँगल असून यामधील पुणे व नाशिक शहराला जोडणाऱ्या हायस्पीड रेल्वेसाठी नासिक,सिन्नर,संगमनेर,नारायणगा
संगमनेर तालुका हा शेती,शिक्षण,सहकार,आर्थिक विकास यामधून राज्यात अग्रगण्य ठरला आहे. यामध्ये रेल्वेने अधिक भर पडणार होती याचबरोबर या विकासाला मोठी गती मिळणार होती. मात्र संगमनेरच्या विकासाला खो घालण्यासाठी ही रेल्वे जाणीवपूर्वक राजकीय हेतू ठेवून पळवली आहे. रेल्वेचा मार्ग नाशिक,शिर्डी,अहिल्यानगर,पुणे असा झाल्यानंतर पुणे ते पुणतांबा यावर अनेक टीका झाली. यानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी सरळ मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला. सत्यजित तांबे यांनी या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली.जनरेटा मोठा आहे. यासाठी आंदोलने ही सुरू होती. संगमनेर, नारायणगाव आणि सिन्नरमध्ये रेल्वे संघर्ष समिती सुरू झाली. खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत तर आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत याबाबत वेळोवेळी आवाज उठवला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवी यांची भेट घेतली. विविध युवकांनी विविध ठिकाणी आंदोलने केली.
मात्र केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अत्यंत असंवेदनशीलपणे नाशिक पुणे सरळ रेल्वे रद्द केल्याची घोषणा करून यामधील राजकारण उघड केले. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्री यांनी गप्प राहण्याची भूमिका घेतली. हे राजकारण सर्व जनतेला कळले आहे विशेष तर यामुळे तरुणाईचे मोठे नुकसान होणार आहे.
नाशिक व पुणे हे आयटी व एमआयडीसी साठी मोठे केंद्र आहे. यामधून मोठे रोजगार युवकांना उपलब्ध होणार आहे. येण्या जाण्याची सोय होणार आहे. त्याचबरोबर शेतमाल विक्रीसाठी मोठी बाजारपेठ मिळणार आहे असे सगळे असताना या विभागाला रोखण्यासाठी हा मुद्दाम डाव खेळला जात असल्याची टीका समनापुरचे शेतकरी भास्कर शर्माळे यांनी केली आहे. हा सरळ मार्ग रेल्वे रद्द करण्याच्या निर्णयावर विविध पत्रकार,समाजसेवक, विचारवंत, प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षक आणि शेतकरी यांनीही टीका केली आहे.
पुणे येथे आम्ही नोकरीसाठी असून रेल्वेमुळे सर्व नागरिकांना सोय होणार होती अनेक युवकांना नोकरीसाठी जास्त संधी मिळणार होत्या मात्र हे स्वप्न भंगले असल्याची सिन्नर तालुक्यातील चास येथील अभियंते संजय खैरनार यांनी केली आहे. आम्ही आयटी विभागात पुणे येथे काम करत असून यामुळे आयटी मधील सर्व युवकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असल्याची भावना आशिष रामकर यांनी व्यक्त केली आहे. पुणे व संगमनेर,नारायणगाव,सिन्नर येथील अभियंते सोशल मीडियावर या विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला असून तरुणाईने आपली मते व्यक्त केली आहे.

नाशिक – पुणे सरळ रेल्वे मार्ग अत्यंत गरजेचा – डॉ.जयश्रीताई थोरात
नाशिक पुणे शहरांना जोडणारा सरळ रेल्वे मार्ग हा मंजूर होऊन शेतकऱ्यांना पैसेही देण्यात आले होते. मात्र जीएमआरटीचे कारण दाखवून मार्ग बदलण्याचा जो घाट घातला आहे. तो अत्यंत दुर्दैवी आहे. हायस्पीड रेल्वेमुळे संगमनेर सह या सर्व मार्गावरील तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी व या विभागाच्या भविष्यातील विकासासाठी महत्त्वाचे दालन खुले होणार आहे. मात्र दुर्दैवाने हा मार्ग बदलला आहे. खरे तर यामुळे संगमनेर तालुक्यासह या मार्गावरील सर्व युवकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे तरुणाई मध्ये मोठा संतापासून केंद्र व राज्य सरकारने सरळ रेल्वे मार्गच करावा ही आमची प्रमुख मागणी असल्याचे संगमनेर तालुका युवा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे.

