संगमनेर, कोपरगाव, नगरची भूमिका ठरणार निर्णायक!

अहिल्यानगर । झुंझार न्यूज

दि अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (ADCC Bank) पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय कार्यवाही वेगाने सुरू झाली असून, सहकार विभागाने जिल्ह्यातील एकूण ५,८९० सभासद संस्थांकडून प्रतिनिधींचे ठराव मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक मतदार संगमनेर, नगर आणि कोपरगाव तालुक्यात असल्याने, हे तीन तालुके जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया बँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष तथा नाशिक विभागीय सहनिबंधक संभाजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. या प्रक्रियेसाठी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे आणि जिल्हा विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे हे आवश्यक सूचना व नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत.


मतदार संस्थांचे वर्गीकरण

बँकेच्या ५,८९० सभासद संस्थांचे मुख्यत्वे तीन गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे:

१. वि.का. सेवा सोसायटी मतदारसंघ: एकूण १,४१४ सोसायट्या असून, यातून १४ संचालक निवडून दिले जातात.

२. शेतीपूरक मतदारसंघ: यामध्ये दुग्धोत्पादक (८६४), शेळीपालन-कुक्कुटपालन (१२०), मच्छिमार (५३) अशा एकूण २,१३७ संस्थांचा समावेश आहे. या गटातून १ संचालक निवडला जातो.

३. बिगरशेती मतदारसंघ: सहकारी बँका, पतसंस्था आणि मजूर संस्था (८५१) मिळून एकूण २,३३९ संस्था आहेत. यातून १ संचालक निवडला जातो.


ठराव प्रक्रियेकडे लक्ष

ज्या संस्था पात्र आहेत, त्यांनी आपल्या संचालक मंडळाची बैठक घेऊन एका प्रतिनिधीचा ठराव निश्चित करायचा आहे. तालुका सहायक निबंधकांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पूर्ण होईल. महत्त्वाचे म्हणजे, ज्या संस्था अवसायानात (बंद) आहेत किंवा ज्यांच्यावर प्रशासक आहे, अशा संस्थांचे ठराव स्वीकारले जाणार नाहीत. सुमारे ५०० पेक्षा अधिक संस्था या प्रक्रियेत अपात्र ठरू शकतात असा अंदाज आहे.


राखीव जागांसाठी एकत्रित मतदान

तालुकानिहाय विकास सोसायटी मतदारसंघातील मतदार केवळ आपल्या तालुक्यातील उमेदवाराला मतदान करतील. मात्र, जिल्ह्यातील सर्व पात्र ५,८९० मतदार संस्थांना ५ राखीव जागांसाठी मतदान करण्याचा अधिकार असेल. यामध्ये:

महिला प्रतिनिधी (२ जागा)

इतर मागास प्रवर्ग – OBC (१ जागा)

अनुसूचित जाती-जमाती – SC/ST (१ जागा)

भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग – VJNT (१ जागा)


संगमनेर, कोपरगाव, नगरचे वर्चस्व

आकडेवारीनुसार, सर्वाधिक मतदार संस्था संगमनेर (९३१) तालुक्यात आहेत. त्यापाठोपाठ नगर (७२५) आणि कोपरगाव (७१५) या तालुक्यांचा क्रमांक लागतो. ज्या उमेदवाराला या तीन तालुक्यांतून मोठे मताधिक्य मिळेल, त्याचे बँकेवरील वर्चस्व अधिक गडद होणार आहे.

तालुकानिहाय सभासद संस्थांची स्थिती:

तालुका वि.का. सोसायटी शेतीपूरक बिगरशेती एकूण

संगमनेर १३५ ४६७ ३२९ ९३१

नगर ११३ १३७ ४७५ ७२५

कोपरगाव ११८ २८१ ३१६ ७१५

श्रीगोंदा १७६ १४२ १३८ ४५६

कर्जत ७६ २६४ ७९ ४१९

राहाता ७५ १६६ १७१ ४१२

अकोले ८९ १९७ १०१ ३८७

राहुरी १११ १२४ १४९ ३८४

नेवासा १३६ ८१ १५३ ३७०

पारनेर १०८ १०९ १३१ ३४८

श्रीरामपूर ७१ ८५ १४० २९६

पाथर्डी ८४ ७७ ५२ २१३

शेवगाव ७४ ५६ ३८ १६८

जामखेड ४८ ५२ ६६ १६६


प्राप्त झालेल्या ठरावांची छाननी केल्यानंतर १७ जुलै रोजी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणुकीचे प्रत्यक्ष वेळापत्रक जाहीर होईल. या निवडणुकीमुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकारण ढवळून निघणार आह

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *