आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण इग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांनी सुंदर असे गणिताचे बेरीज , वजाबाकी करणे , गुणाकर करून व बेरीज करून टेबल्स तयार करणे , भौमितिक आकार , वर्ग व वर्गमूळ , घन घनमुळ आठवड्यातील दिवस , पूर्णांक अपूर्णांक , पाढयाची जादू , मराठी महिने , बेरजेची  गंमत , कॅरी ओव्हर चे उदाहरणे , बोरोविंग ची वजाबाकी , बोटावरची आकडे मोड सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा केला .
हा दिवस भारतातील महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना समर्पित आहे. 2012 मध्ये, केंद्र सरकारने अशी घोषणा केली होती की, दिग्गज गणितज्ञ रामानुजन यांच्या स्मरणार्थ 22 डिसेंबर हा त्यांचा वाढदिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये गणिताच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करणे.   विद्यार्थ्यांना गणिताच्या क्षेत्रात संशोधन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आज प्राथमिक विभागाच्या वतीने बालपणच्या पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांनी सुंदर असं सादरीकरण करण्यात आलं.
गणित आणि गणना हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. शाळेत गणित शिकण्यापासून ते आपल्या नियमित जीवनात अमलात आणण्यापर्यंत या विषयाचे महत्त्व आपण दुर्लक्षित करू शकत नाही. गणित शिकण्यातही मजा आहे. युक्त्या आणि टिपा ते अधिक मनोरंजक बनवतात. आपल्या नियमित जीवनात गणित शिकण्याच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय गणित दिन साजरा केला जातो. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, महावीर, भास्कर दुसरा, श्रीनिवास रामानुजन आणि इतर अनेक गणितज्ञांच्या योगदानाने गणिताचे क्षेत्र समृद्ध झाले आहे. या विशेष दिवशी, लोक श्रीनिवास रामानुजन यांचे स्मरण करतात आणि त्यांचा आदर करतात आणि त्यांच्या गणिताच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करतात. या दृष्टीनेच आज बालपण स्कूल पानोडी येथे गणित दिनाचे आयोजन करण्यात आले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *