श्रीगोंदा । झुंजार न्यूज
माळेगाव बारामती येथे परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय टेक्निकल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश संपादन केले.
यामध्ये विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेसेंटेशन कॉम्पिटिशन, प्रोजेक्ट कॉम्पिटिशन, क्विझ कॉम्पिटिशन अशा विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. राज्यस्तरीय टेक्नोव्हिजन 2025 या स्पर्धेचे आयोजन शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, माळेगाव (बु.), बारामती. यांच्या वतीने करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध तंत्रनिकेतन महाविद्यालयांमधून विद्यार्थी सहभागी झाले होते.

यामध्ये परिक्रमा तंत्रनिकेतन मेकॅनिकल विभागातील तृतीय वर्षात शिकणारे विद्यार्थी कु. प्रणव सुतार, कु. आकाश चव्हाण, कु. ओम भवर, कु. अनिकेत जाधव या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांनी दुचाकी वाहनाच्या साईड स्टैंड वरती संशोधन करून साईड स्टॅन्ड मुळे होणारे अपघात 100% कमी होतील या दृष्टीने एक नवीन कल्पनेवरती संशोधन करून ती यशस्वी करून दाखवली.

परिक्रमा तंत्रनिकेतन मार्फत आणखी या संशोधनावरती काम करून ती लवकरात लवकर सर्वांना उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती संस्थेचे प्राचार्य यांनी दिली. या विद्यार्थ्यांना परिक्रमा तंत्रनिकेतन चे प्राचार्य प्रा. डॉ. प्रशांत सूर्यवंशी सर, विभाग प्रमुख श्री सिताराम बेदरे सर, श्री अतुल गवते सर, श्री सत्यम भवर सर, श्री दत्तात्रेय पासलकर सर, श्री रोहित धेंडे सर, श्री स्वप्निल बिबे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

मा.श्री.बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्टचे संस्थापक माजी मंत्री श्री.बबनरावजी (दादा) पाचपुते, संस्थेच्या अध्यक्षा डॉ.सौ.प्रतिभाताई बबनरावजी पाचपुते, सचिव मा.श्री.आमदार विक्रमसिंह बबनरावजी पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.अॅड. प्रतापसिंह बबनरावजी पाचपुते, अॅकॅडेमिक डायरेक्टर मा.सौ.इंद्रायणी प्रतापसिंह पाचपुते, मुख्य प्रशासकीय अधिकारी व अतिरीक्त कार्यकारी अधिकारी श्री.अनिल पुंड सर, डेप्युटी अॅकॅडेमिक डायरेक्टर प्रा.डॉ.संजीव कदमपाटील सर तसेच परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ.प्रशांत सूर्यवंशी सर, इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ.मोहन धगाटे सर, बी.फार्मसी प्राचार्य डॉ.सुनिल निर्मळ सर, एमबीए डायरेक्टर डॉ.सुदर्शन गिरमकर सर, सायन्स प्राचार्य डॉ.पी.ए.इथापे सर, व डी.फार्मसी प्राचार्य डॉ.रमेश शिंदे सर यांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

