संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

संगमनेरात गेली चाळीस वर्षात शिवजयंती साजरे न करणारे खऱ्या अर्थाने आपल्यामुळे साजरी होत आहे संगमनेर तालुक्या मध्ये परिवर्तन झाल्यानंतरच काही जण शिव जयंती साजरी करू लागले याचा मला आनंद असल्याचा खोचक टोला आ अमोल खताळ यांनीविरोधकांचे नाव न घेता लगावला

 

 

संगमनेर शहरातील बस स्थानकावरती गुरुद्वाराच्या समोर असणाऱ्या प्रांगणात महायुतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा आणि किल्ला देखाव्याचे उद्घाटन आ अमोल खताळ आणि त्यांच्या सुविध्य पत्नी निलम खताळ यांच्या हस्तेकरण्यात आले .सर्वप्रथम क्रेनच्या साह्याने आ खताळ यांनी सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यावरती पुष्पवृष्टी करून महाआरती करण्यात आली

 

 

 

आ खताळ म्हणाले की संगमनेरला महायुतीच्या वतीने शिवजन्मोत्सव धुम धडाक्यात साजरा करण्यात येत आहे. मागील महिन्यात सुद्धा शिवजयंती मोठ्या उत्साहात शिवसेना महायुतीच्या वतीने साजरी करण्यात आली होती तेव्हाच आमदार खताळ यांनी सांगितले होते पुढील महिन्यात मोठ्या उत्साहात आपण मिरवणूक, किल्ला बनवुन जयंती साजरी करणार आहे. पुढील कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व महापुरुष यांचे कार्यक्रम महा युतीच्या वतीने घेतले जाणार आहे. महा युती आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आयोजित सर्व कार्यक्रमामध्ये तसेच मिरवणुकीत शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ अमोल खताळ यांनी केले यावेळी संगमनेरकर शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास आ अमोल खताळ यांच्या हस्ते दुग्धाभिषेक

 

संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे आ अमोल खताळ यांच्या हस्ते महाराजा यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली. संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्व शहर भगवेमय झाले आहे याचा आम्हा सर्व शिवभक्तांना आनंद आहे

 

 

संगमनेर शहरातील बस स्थानकावर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमा तून एक कोटी रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे संगमनेर शहरात महायुतीच्या वतीने सायंकाळी मिरवणूक काढण्यात येणार आहे या मिरवणुकीत संगमनेर शहरातील शिवप्रेमी भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे ही आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे

 

 

यावेळी भाजपनेते ज्ञानेश्वर कर्पे शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे रमेश काळे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी दिनेश फटांगरे खांबाचे सरपंच रवींद्र दातीर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *