{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

कमान कोसळल्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करा

महायुती विरोधात तालुक्यासह राज्यात प्रचंड संतापाची लाट

संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

फक्त राजकीय उद्देश ठेवून जयंती साजरी करणारे संगमनेरचे शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी व महायुतीचे समर्थक कार्यकर्ते  यांच्या गलथान कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांची उभारलेली स्वागत कमान कोसळली असून यामुळे राज्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून आयोजकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी शिवप्रेमी व विविध संघटनांनी केली आहे.

 

 

खरे तर संगमनेर शहरांमध्ये शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मागील सोळा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्व राजकीय पक्ष व संघटना एकत्र येऊन साजरी करत होते. यामध्ये कधीही गटबाजी झाली नाही अत्यंत शांततेने व आनंदाने ही शिवजयंती साजरी होत होती आणि ही संगमनेर तालुक्याची खरी परंपरा होती.

 

 

Oplus_131072

 

 मात्र यावर्षी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करून प्रशासनावर दबाव टाकून परवानगी मिळवली.प्रशासन परवानगी देत नसतानाही संगमनेर बस स्थानक परिसरामध्ये महायुतीच्या वतीने  कमान उभारण्यात आली होती. मात्र राजकीय उद्देश ठेवून उभारलेली ही कमान अजिबात सुरक्षित नव्हती. आयोजकांचे याकडे लक्षही नव्हते. फ्लेक्स बाजी व सोशल मीडियावर दंग असणाऱ्या कार्यकर्त्यांनी याकडे लक्ष दिले नाही.

 

Oplus_131072

 

 

राजकीय स्वार्थासाठी केलेली जयंती आणि कमान ही जनतेने ओळखली होती त्यामुळे संगमनेर शहर व तालुक्यामधील जनतेने महायुतीच्या या देखाव्यांकडे पाठ फिरवली. महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून विनापरवानगी अनेक फ्लेक्स लावण्यात आले . फ्लेक्स बाजीवर नव्या कार्यकर्त्यांचा जोर असल्याने संगमनेर शहर विद्रूप होत आहे याबाबत अनेक संघटनांनी विरोध सुद्धा केला आहे .मात्र प्रशासनही सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाले आहे.

 

 

Oplus_131072

 

फ्लेक्सचा अतिरेक व विद्रुपपणा संगमनेर मध्ये कधीही नव्हता. ऐन गर्दीमध्ये ही कमान कुणावर पडली असती तर मोठा अनर्थ झाला असता. ही कमान  कोसळल्यामुळे काही विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे.

 

 

Oplus_131072

 

याचबरोबर महाराजांची प्रतिमा आणि किल्ल्यांची रचना असलेल्या ही कमान पडल्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या गड किल्ल्यांची मोठी अवेहलन झाली आहे. याचबरोबर महायुती व संगमनेरचे लोकप्रतिनिधी यांची मोठी नाचक्की झाली आहे.

 

 

Oplus_131072

 

कमान पडल्याची बातमी कळताच संपूर्ण  संगमनेर मध्ये तमाम शिवप्रेमी मध्ये मोठी संतापाची लाट निर्माण झाली.

 

 

Oplus_131072

निष्काळजीपणे काम करणाऱ्या या सर्व पदाधिकारी व आयोजकांवर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी संगमनेर मधील तमाम शिवप्रेमी व विविध संघटनांनी केली आहे.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *