मुंबई । झुंजार न्यूज
महामानव क्रांतीसुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 19927 रोजी महाड चवदार तळे येथे पाण्याचा सत्याग्रह करून मानवमुक्तीचा संगर उभारला.समतेच्या लढाईची मुहूर्तमेढ रोवली गेली.त्या ऐतिहासिक संगराचा; चवदार तळे सत्याग्रहाचा यंदा 98 वा वर्धापन दिन आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उद्या गुरुवार दि.20 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता क्रांतीभूमी महाड येथील क्रांतीस्तंभाजवळ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली जाहीर अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे .
क्रांतीभूमी महाड येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनी राज्यभरातील हजारो आंबेडकरी अनुयायी चवदार तळे परिसरात येऊन चवदार तळे येथे झालेल्या क्रांतीला क्रांतीसुर्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतात.रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दरवर्षी चवदार तळे येथे जाहीर अभिवादन सभा आयोजित करण्यात येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केली जाते.
चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनी क्रांतीभूमी महाड मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढली जाते अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.
