संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर येथे नुकतेचं श्री. स्वामी समर्थ बबल प्लेवर्ड सोडा आणि वाह प्लेवर्ड पाणीपुरी या नूतन फर्मचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख आणि परमपूज्य प्रदीप दादा सोनवणे यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

 

 

 

याप्रसंगी बोलताना राजहंस दूध संघाचे चेअरमन मा. रणजितसिंह देशमुख यांनी फर्मच्या मालकांना शुभेच्छा दिल्या आणि हे नवे व्यावसायिक दालन जाखुरी पंचक्रोशीतील ग्राहकांना उत्तम दर्जाची उत्पादने देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

 

 

या उद्घाटन सोहळ्याला बी.जे. देशमुख, ह.भ.प. रक्टे महाराज, महंत संजय महाराज देशमुख, राजेंद्र देशमुख, शिवाजी देशमुख, फर्मचे प्रोप्रा. किशोर देशमुख, श्री. सचिन वर्पे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

या नवीन व्यवसायामुळे संगमनेर शहरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, ग्राहकांना आता विविध प्रकारचे प्लेवर्ड सोडा आणि स्वादिष्ट पाणीपुरीचा आस्वाद घेता येणार आहे

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *