संगमनेर । झुंझार न्यूज
महाराष्ट्राच्या राजकारणासह विविध क्षेत्रात नेतृत्वाने आपली उंची वाढवली ही एक परंपरा आहे अनेक नेतृत्वाने आपल्या – आपल्या भागातल्या सहकाराच्या माध्यमातून राजकारणासह विविध क्षेत्रात एक विकासाची दिशा निर्माण केल्याने ते लोक प्रवाहात सातत्याने आज ही राहिले .
सहकार महर्षी स्व भाऊसाहेब थोरात यांनी सहक र चळवळ उभी करत गोर गरिब , कष्टकरी , शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होण्याकरिता विविध सहकार संस्था उभ्या केल्या केवळ उभ्याचं नव्हे तर एक पारदर्शकता , स्वच्छ , नेत्रदीपाने संस्थाचे जतन केल्यानेचं आज राज्य नव्हेतर देशात संगमनेर ‘ सहकार ‘ मॉर्डल म्हणून बघितले जाते .माजी महसूलमंत्री आ बाळासाहेब थोरात यांचा राजकीय व सामाजिक वसा चालवण्याची जबाबदारी त्यांच्या अनेक शिल्लेदारावर आहे. उभ्या केलेल्या प्रत्येक सहकारी संस्था आर्थिक बळकट करण्याची जबाबदारी शिल्लेदारांनी घेतली. नि स्वार्थी व प्रामाणिकपणे त्यांनी त्या संस्थेचा विकास व विस्तार करण्यांचे काम केले ज्या प्रमुख संस्था नेतृत्वाने हे काम केले. त्यामध्ये महानंदचे माजी अध्यक्ष तथा संगमनेर तालुका सह. दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन मा. श्री. रणजितसिंह देशमुख हे होय .

संगमनेर तालुक्यातील अंभोरे या छोट्याशा गावातून आपल्या सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात करणाऱ्या मा. श्री. रणजितसिंह देशमुख यांनी अत्यंत अल्प काळात आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे. 24 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांचा वाढदिवस असल्याने ‘राजहंस’ सारख्या दुधाची क्रांती करणाऱ्या व शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबी करणाऱ्या संस्थेत त्यांनी केलेले काम नेत्रदीपक असे आहे. रणजितसिंह देशमुख म्हणजे अत्यंत ध्येयवादी , मितभाषी, निरागस चेहऱ्याचे व तरुणांसह अनुभवी लोकांना हवेहवेसे वाटणारे नेतृत्व हे बाळासाहेब थोरात यांच्या पुढच्या पिढी साठी दिशादर्शक ठरणारे आहे.

आजमितीला ‘राजहंस’ दूध संघाची प्रगती तर होतच आहे मात्र त्याचबरोबर त्यांच्यावर सोपवलेली एक महत्वपूर्ण जबाबदारी म्हणजे राज्यात ‘महाविकास’ आघाडीचे सरकार असताना ‘ महानंदा ‘ सारख्या दुग्धव्यवसायाची शिखर संस्थाची जबाबदारी आ. बाळासाहेब थोरात, राज्याचे तत्कालिन उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांनी रणजितसिंह देशमुख यांचेवर सोपवली होती. हा एका अर्थाने संगमनेरकरांचा सन्मानचं झाला.

आपल्या अध्यक्षपदाचा कार्यकाळात रणजितसिंह देशमुख यांनी महानंदला आर्थिक स्थैर्य देण्याबरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विशेष करून मुंबई शहरात ज्या पद्धतीने महानंदाची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केला कोरोनाच्या वैश्विक साथीच्या कसोटीच्या काळात त्यांनी महानंदाचा दूध भुकटी प्रकल्प सुरू करून राज्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात दिल्याने ते कौतुकास पात्र ठरले तर विरोधकांनी सुध्दा गुणगान गायले . महानंदाचे सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा त्यांना मान मिळाला .

मा. रणजितसिंह देशमुख यांनी महानंदचे धूरा यशस्वीपणे सांभाळताना संगमनेर येथील राजहंस तालुका सह. दूध उत्पादक संघाची धूरा ही यशस्वीपणे सांभाळत राष्ट्रीय व राज्यस्तरिय उत्कृष्ट डेअरी व्यवस्थापन , उत्कृष्ट सहकरी दूध संघ हे पुरस्कार मिळाले . त्यांनी राजहंस दूध ज्या कार्य कौशल्याने विकसित केली त्याच पद्धतीने आपल्या संपूर्ण गुणवत्तेचा व कौशल्याचा उपयोग करून आपल्या कार्यकाळात महानंदाची एक उंची वाढविण्याचा प्रयन केला. व राज्यस्तरावरील एका प्रमुख संस्थेत काम करण्याची संधी मिळाली, त्या संधीचे त्यांनी सोनं केले. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली रणजितसिंह देशमुख यांनी सुरु केलेली आपली राजकीय व सामाजिक कारकीर्द महाराष्ट्राला आर्थिक क्रांतीच्या वाटेने घेऊन जाईल यात शंका नाही. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांमध्ये होत असलेली चर्चा समोर आली की , येता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुसंस्कृत , ध्येयवादी व लोकांचे संघटन करणाऱ्या व्यक्तीला राजकरणात काम करण्याची संधी मिळावी त्याच दृष्टीन रणजितसिह देशमुख यांच्याकडे एक आशावादी समुह त्या नजरेने बघत आहे खरोखर चांगल्या व प्रामाणिक माणसाची गरज आहे .

वाढदिवसानिमित्ताने …. एक विचार
श्री राहुल खेमनर ( सामाजिक कार्यकर्ता )
