छावा ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी आणि संघटनेची व्याप्ती वाढवण्यासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेश कार्याध्यक्ष गणेश तोरमल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रविण कानवडे यांची छावा ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली एका विशेष कार्यक्रमात या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी संघटनेच्या विविध स्तरांवरील महत्त्वाच्या पदांच्या जबाबदाऱ्या ही सोपवण्यात आल्या. यामध्ये प्रदेश उपाध्यक्षपदी प्रदीप औटी यांची निवड करण्यात आली, तर संगमनेर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी प्रविण कासार आणि संगमनेर शहर अध्यक्ष पदाची धुरा ज्ञानेश्वर माळी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत म्हणाले की , छावा बिग्रेड संघटना ही छत्रपती , शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारी संघटना असून सर्वाना बरोबर घेवून विश्वासाने , प्रामाणिक प्रमाणे संघटना बळकटीकरणासाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी छावा ब्रिगेडचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे पाटील, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश बनसोडे, राजे प्रतिष्ठानचे शंकर गोरडे यांसह अनेक मान्यवर , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘घर तिथे छावा’ आणि ‘घर तिथे संभाजी महाराज’ नियुक्तीनंतर आपली भूमिका मांडताना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “सर्व महापुरुषांबद्दल आदर राखून संघटना काम करेल. ‘घर तिथे छावा ब्रिगेड’ हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही घराघरात पोहोचू. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास आणि त्यांच्या प्रतिमा प्रत्येक घरात पोहोचवण्याचा आमचा संकल्प असल्याचे प्रदेशाधक्ष प्रविण कानवडे यांनी सांगितले .