झरेकाठीत पाण्याच्या टाकीजवळ पोलिसांची कारवाई

 

 

आश्वी । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी गावातील पाण्याच्या टाकीजवळ देशी दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या एका युवकास अटक करून पोलिसांनी सुमारे ५२ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत देशी दारूच्या बाटल्यांसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.


याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्याचे पो.शि. नामदेव गंगाधर बिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत अण्णासाहेब आहेर (रा. झरेकाठी, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै रोजी रात्री सुमारे ९.५६ वाजण्याच्या सुमारास झरेकाठी गावातील पाण्याच्या टाकीजवळ गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. आरोपी त्याच्या ताब्यातील हिरो होंडा कंपनीच्या डीलक्स मोटारसायकल क्रमांक (एमएच-१७-डि.डि.९४३२) या दुचाकीवर काळ्या रंगाच्या पिशवीत देशी दारू विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करत असल्याचे आढळून आले.


झडतीदरम्यान पोलिसांनी बॉम्बे संत्रा देशी दारूच्या १०० मिलीच्या २६ सीलबंद बाटल्या जप्त केल्या. या दारूची किंमत २,०३० रुपये, तर दुचाकीची किंमत ५० हजार असून, एकूण ५२,०३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार बर्डे करीत आहेत.


ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *