विजयाचा विश्वास व्यक्त

संगमनेर । झुंझार न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, दिवाळीच्या धामधुमीनंतर आता इच्छुकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक असून, त्यात आर.बी. रहाणे यांनीही आपली इच्छा जाहीर केली आहे. नेत्यांनी उमेदवारी दिल्यास आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


आर.बी. रहाणे, जे संगमनेर तालुक्यात ‘आर.बी. शेठ’ या नावाने परिचित आहेत, त्यांनी आपली राजकीय महत्त्वाकांक्षा स्पष्ट केली आहे. त्यांची इच्छा आहे की, जर त्यांना नेत्यांनी चंदनापुरी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली, तर ते ही निवडणूक लढवण्यास तयार आहेत. त्यांना खात्री आहे की, आपण या निवडणुकीत निश्चितपणे विजयी होऊ.

 

रहाणे यांचा किसान ट्रान्सपोर्ट , किसान हार्डवेअर आदी व्यवसायाच्या माध्यमातून व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांशी जवळचा संपर्क आहे. या व्यवसायामुळे त्यांची तालुक्यात सर्वदूर ओळख निर्माण झाली आहे. याशिवाय, संगमनेर तालुका दूध संघाचे ५ वर्ष चेअरमन यासह इतर विविध सहकारी संस्थांवर काम करत असताना त्यांनी लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले आहेत. त्यांच्या या जनसंपर्कामुळे त्यांना ही निवडणूक आशादायी वाटत आहे.

 

निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांची धावपळ सुरू असून, प्रत्येकजण आपापल्या परीने उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. काहीजण नेत्यांभोवती फिरत आहेत, तर काहीजण प्रसिद्धीच्या माध्यमातून आपली इच्छा प्रकट करत आहेत. या पार्श्वभूमीवर, आर.बी. रहाणे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत, नेत्यांनी संधी दिल्यास जनतेच्या सहकार्याने विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *