भविष्यात जिल्हा भाजपामय होणार : ना. विखे पाटील
पाथर्डी । झुंझार न्यूज
पाथर्डी नगरपरिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य जाहीर सभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा तथा पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
“शहराचा कायापालट करण्यासाठी आणि केंद्र व राज्याचा निधी थेट पाथर्डीपर्यंत पोहोचवण्यासाठी पालिकेत भाजपची सत्ता आवश्यक आहे,” असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले .

विकासाचे ‘डबल इंजिन’ पाथर्डीत आणा : देवेंद्र फडणवीस
सभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पाथर्डी शहराच्या पाण्याचा प्रश्न असो किंवा रस्ते आणि स्वच्छतेचा, आमदार मोनिकाताई राजळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, जर नगरपरिषदेत भाजपचे पूर्ण बहुमत आले आणि नगराध्यक्षपदी अभय काका अव्हाड यांच्यासारखा अनुभवी चेहरा बसला, तर विकासाचे ‘डबल इंजिन’ अधिक वेगाने धावेल. आम्ही दिलेला निधी योग्य ठिकाणी खर्च झाला तरच शहराचा चेहरामोहरा बदलेल, म्हणूनच भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करत शहराच्या विकासाचा रिमोट कंट्रोल भाजपाच्याचं हातात दया निधी कमी पडू देणार नाही .
विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका जिल्हयाच्या विकासाकरिता पाथर्डीत भाजपाचा विजय अनिर्वाय असून भविष्यात जिल्हा भाजपामय दिसणार असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संकल्प केल्याचे सांगितले

तर पाथर्डी तालुक्यावर राजळे परिवाराचे मोठे संस्कार आणि कर्तृत्व आहे. जिल्ह्याच्या राजकारणात पाथर्डीचे स्थान महत्त्वाचे आहे. केवळ निवडणुकांपुरते आश्वासन देणाऱ्यांना घरी बसवून, काम करणाऱ्या हातांना साथ द्या. महायुती सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असून पाथर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.

गडावर भगवाच फडकणार : आमदार मोनिका राजळे
आमदार मोनिकाताई राजळे यांनी आपल्या भाषणात शहरातील प्रलंबित कामांची आणि भविष्यातील नियोजनाची माहिती दिली. “आमच्या नगरसेवकांनी पाच वर्षे जनतेची सेवा केली आहे. अभय काका अव्हाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपची टीम पुन्हा एकदा शहराच्या विकासासाठी सज्ज आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय काका अव्हाड, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अजय रक्कटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सभेला पाथर्डी शहरातील नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. या सभेमुळे भाजपच्या प्रचारात मोठी हवा निर्माण झाली असून, शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.
या सभेला भाजपचे सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
Post Views: 584


