आश्वी खुर्द । झुंझार न्यूज

आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना डिजिटल प्रवाहात सामील करून घेण्यासाठी आश्वी खुर्द येथील एक उमदे नेतृत्व सातत्याने झटत आहे. ‘आर.एफ. कॉम्प्युटर्स’ (RF Computers) आणि ‘आर.एफ. कॉम्प्युटर एज्युकेशन’चे संस्थापक सागर दिनकर भडकवाड यांनी गेल्या १५ वर्षांपासून आपल्या कार्याचा ठसा उमटवला असून, त्यांच्या माध्यमातून आश्वी खुर्द परिसरात डिजिटल साक्षरतेची नवी पहाट उगवली आहे.

 

१५ वर्षांपासून अविरत सेवा

सागर भडकवाड यांनी दीड दशकापूर्वी जेव्हा ग्रामीण भागात संगणक साक्षरता कमी होती, तेव्हापासून ऑनलाईन सेवा देण्यास सुरुवात केली. आज शासकीय योजनांचे लाभ मिळवून देणे असो, वा विविध दाखल्यांची पूर्तता करणे असो, सामान्य माणसासाठी ‘आर.एफ. कॉम्प्युटर्स’ हा हक्काचा आधारवड ठरला आहे. उत्पन्न, जात, रहिवासी प्रमाणपत्रे, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि विविध शैक्षणिक अर्जांच्या प्रक्रियेत त्यांनी नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे प्रशासन आणि जनता यांमधील अंतर कमी होऊन डिजिटल दरी सांधली गेली आहे.

 

केवळ व्यवसाय न करता सामाजिक उत्तरदायित्व म्हणून त्यांनी ‘आर.एफ. कॉम्प्युटर एज्युकेशन’च्या माध्यमातून शेकडो युवक-युवतींना संगणकाचे तांत्रिक शिक्षण दिले आहे. आज या केंद्रातून शिक्षण घेतलेले अनेक तरुण स्वावलंबी झाले असून, विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी मिळवत आहेत. ग्रामीण भागातील तरुणांना आत्मनिर्भरतेची नवी दिशा देण्याचे काम भडकवाड यांनी यशस्वीपणे पेलले आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून गावाच्या विकासात सहभाग

सागर भडकवाड यांचे कार्य केवळ डिजिटल सेवांपुरते मर्यादित नाही. सध्या ते आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून कार्यरत असून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमीच सक्रिय असतात. जनतेच्या समस्या जाणून घेणे, त्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि त्यावर योग्य तो तोडगा काढणे यात त्यांचा हातखंडा आहे. कोणताही भेदभाव न करता, सर्वांसाठी उपलब्ध असणारा एक अभ्यासू आणि शांत संयमी लोकप्रतिनिधी अशी त्यांची परिसरात ओळख निर्माण झाली आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आश्वी खुर्दसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या कार्यामुळे गावाच्या नावलौकिकात भर पडली आहे. रविवार दि. १८ जानेवारीला त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होणारचं आहे.

 

त्यांच्या पुढील वाटचालीस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीचं शुभकामना झुंझार न्यूज परिवाराकडून !

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed