शिर्डी । झुंझार न्यूज
सत्य, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारितेचा वारसा जपणारा ‘साईवेद प्रकाशन’ समूहाचा ‘दैनिक राष्ट्र सह्याद्री’ आता साईंच्या पावन नगरीतून आपला नवा प्रवास सुरू करत आहे. शिर्डी येथील साईप्रसाद कॉम्प्लेक्स (बस स्थानका शेजारी) येथे दैनिक राष्ट्र सह्याद्रीच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले. सनई-चौघड्यांचे मंगल सूर आणि ‘साई राम’च्या गजराने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.
या सोहळ्याचे उद्घाटन ब्रह्मांड आयुर्वेद पीठ, पुणे येथील स्वामी निर्मलानंद महाराज आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार आशुतोष काळे, युवानेते विवेक कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी संपादक करण नवले आणि कार्यकारी संपादिका पूनम नवले यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
पत्रकार करण नवले यांनी सात वर्षांपूर्वी ‘दैनिक राष्ट्र सह्याद्री’चे रोपटे लावले होते. आपल्या धारदार लेखणीच्या जोरावर अल्पावधीतच या वृत्तपत्राने जनसामान्यांच्या मनात स्थान निर्माण केले. शिर्डीतील या नवीन कार्यालयामुळे या वृत्तपत्राचा विस्तार आता अहमदनगर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात अधिक प्रभावीपणे होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला शिर्डी आणि पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने
राजकीय नेते: उपनगराध्यक्ष अभय शेळके, भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा, शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, नगरसेवक निलेश कोते, सतिश गोंदकर, अमित शेळके, नितीन कोते, बापू ठाकरे, नितीन पाराजी कोते, सरपंच महेश जमधडे (सावळीविहीर), माजी सरपंच भाऊसाहेब जाधव (शिंगवे).
प्रशासन व सामाजिक: जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, रिपाई कार्याध्यक्ष चांगदेव जगताप, रोहिणी पवार (रणरागिणी फाउंडेशन), विमल वाकचौरे, साई संस्थानचे सुरक्षा निरीक्षक कैलास शेजवळ.
वैद्यकीय व व्यावसायिक: डॉ. अभिमन्यू कडू, डॉ. नचिकेत वर्पे, उद्योजक योगेश जमधडे, विराट पुरोहित.
पत्रकारिता: राजेश गायकवाड, पंढरीनाथ पगार, अमोल कोते, सुनील दवंगे, किरण सोनवणे, कोंडीराम नेहे, राजकुमार गडकरी, सुयोग सावकारे, प्रशांत अग्रवाल.

राष्ट्र सह्याद्रीच्या शिर्डी कार्यालयाला शुभेच्छा देण्यासाठी वाचकांनी आणि चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. हार-तुरे, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन संपादक करण नवले व त्यांच्या टीमचे कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिर्डी कार्यालय प्रमुख अशोक दुशिंग यांनी विशेष परिश्रम घेतले तर प्रमोद कुंभकर्ण, लक्ष्मण जावळे, सिद्धार्थ मेहरखांब, योगेश कडसकर, शंकर सोनवणे, शहाजी दिघे, सोमनाथ डोळे, व्यवस्थापक राज चौधरी, सोमनाथ मुळे, अजित शिरसाठ, दिनकर शेजूळ, शफीक बागवान या राष्ट्र सह्याद्रीच्या सहकार्यांनी उपस्थिती लावली .

शिर्डीतील या कार्यालयाच्या माध्यमातून आता सर्वसामान्यांचे प्रश्न अधिक प्रखरतेने मांडले जातील, असा विश्वास यावेळी उपस्थितीनी व्यक्त केला. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन सिध्दार्थ मेहेरखांब यांनी केले .




