◼️ मुदत संपल्याने लोकप्रतिनिधींची सत्ता संपुष्टात,

◻️पाहा तुमच्या गावाचा प्रशासक कोण?

 

आश्वी । झुंझार न्यूज 

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ९४ ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत संपल्याने, या सर्व गावांमध्ये आता ‘प्रशासक राज’ सुरू झाले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने या ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकारी व समकक्ष दर्जाच्या शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. यामुळे आता गावाच्या विकासाच्या चाव्या आणि दैनंदिन कारभार सरकारी अधिकाऱ्यांच्या हाती सोपवण्यात आला आहे.

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसोबतच अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही प्रलंबित आहेत. प्रभाग रचना आणि आरक्षणाचे पेच यामुळे निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. लोकप्रतिनिधींची कायदेशीर मुदत संपल्यामुळे गावातील प्रशासकीय कामात खंड पडू नये, यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

पाहा कोणाकडे कोणत्या गावाचा कारभार?
तालुक्यातील महत्त्वाच्या गावांची जबाबदारी खालीलप्रमाणे सोपवण्यात आली आहे

श्री. संजय रामनाथ वाकचौरे: कुरण, मालदाड, देवकौठे.
श्रीम. सुनंदा ठोकळ: कुरकुंडी, आंबी खालसा.
श्रीम. वाडेकर बी.डी.: कुरकुटवाडी, म्हसबंडी, भोजदरी.
श्री. दिनेश रामहरी बिंद: लोहारे, मेढवण, पारेगांव बुद्रुक, कासारे.
श्रीम. जाधव पी.ए.: महालवाडी, जवळेबाळेश्वर.
श्रीम. पाटील एस.सी.: माळेगांव हवेली, खांजापुर.
श्रीम. कासार एस.डी.: माळेगांव पठार, वरुडी पठार.
श्रीम. वाकचौरे व्ही.ए.: मंगळापुर, कौठे धांदरफळ.
श्री. राजेंद्र मधुकर कासार: मनोली, शिबलापुर, औरंगपुर, चिंचपुर बुद्रुक.
श्रीम. नंदा शंकर वलवे: मिरपुर, तिगांव.
कु. बिल्लाडे एन.ए.: मिर्झापुर, सांगवी.
श्रीम. गवारी ए.व्ही.: नांदुर खंदरमाळ, पिंपळगांव देपा.
श्री. प्रज्योत राजेंद्र झावरे: नांदुरी दुमाला, निमगांव बुद्रुक, निमगांव खुर्द.
श्री. कल्याण मारुती राऊत: निमगांव टेंभी, चंदनापुरी, देवगांव, हिवरगांव पावसा.
श्री. मदन उत्तम शेवाळे: ओझर बुद्रुक, पानोडी, कनोली.
श्री. अजिदानंद बबन पावसे: पळसखेडे, वेल्हाळे, डिग्रस, कऱ्हे.
श्री. सुखदेव नावजी मरभळ: पारेगांव खुर्द, पिंपळे, सुकेवाडी, कौठे कमळेश्वर.
श्री. पारधी वाय. आर.: पेमगिरी, सावरचोळ, शिरजगांव धुपे.
श्रीम. पवार एस.एस.: पिंपळगांव माथा, वनकुटे.
श्री. विजय भास्कर कांबळे: पिंप्री लोकी अझमपुर, दाढ खुर्द, खळी.
श्री. कुनाल दत्तात्राय भोरस: पोखरी बाळेश्वर, सावरगांव घुले, खंदरमाळवाडी, आंबी दुमाला.
श्री. काशिनाथ धोंडीराम सरोदे: प्रतापपुर, शेडगांव, झरेकाठी, चणेगांव.
श्री. आदित्य बाळु सदगिर: राजापुर, वडगांव लांडगा, चिखली, जवळेकडलग.
श्री. दत्तात्राय मैड: रायते, जाखुरी, कासारा दुमाला.
श्री. सतिष शामलाल नरवरे: रायतेवाडी, झोळे, खांडगांव.
श्री. प्रदिप वर्पे: समनापुर, वडगांव पान, कोकणगांव, कोंची मांची.
श्री. सदानंद लहाणु डोखे: संगमनेर खुर्द, वरवंडी, खांबे, खरशिंदे.
श्रीम. मंगला धोंडिबा कलगुंडे: सावरगांवतळ, शिरापुर.
श्रीम. तृप्ती सुरेश गाडेकर: सोनेवाडी, सोनोशी.
श्रीम. कुळधरण सोनाली: शिंदोडी, शेंडेवाडी.
श्रीम. मुन्तोडे सुरेखा: बोटा, अकलापुर.
श्रीम. गोसावी व्ही. आर.: कौठे बुद्रुक, कोठे खुर्द.
कु. हासे एम.एम.: हिवरगांव पठार, कोठे मलकापुर.

विकासाच्या कामांवर होणार परिणाम?

ग्रामपंचायतींवर प्रशासक आल्याने सरपंच आणि सदस्यांना असलेले अधिकार संपुष्टात आले आहेत. गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी आता नागरिकांना या नियुक्त प्रशासकांशी संपर्क साधावा लागणार आहे. अनेक ठिकाणी एकाच अधिकाऱ्याकडे ३ ते ४ गावांचा कारभार असल्याने, कामांचा निपटारा होण्यास वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणुका कधी होणार याबाबत अद्याप निश्चिती नसली तरी, इच्छुक उमेदवारांनी आता आगामी आरक्षणाकडे लक्ष केंद्रित केले आहे. प्रशासक नियुक्तीमुळे गावातील राजकीय हालचालींना तात्पुरता ब्रेक लागला असला तरी पडद्यामागून निवडणुकीची तयारी जोमाने सुरू आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *