अकोले । झुंझार न्यूज

जिल्हा परिषद अहिल्यानगर अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२६ मध्ये पंचायत समिती अकोलेच्या पुरुषांनी नेत्रदीपक कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारात उत्तुंग यश मिळविले.

अहिल्यानगर येथे माऊली सांस्कृतिक भवन मध्ये आयोजित कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ व उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्या प्रमुख उपस्थित व मार्गदर्शनाखाली या स्पर्धा संपन्न झाल्या. पंचायत समिती अकोलेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून विविध क्रीडा प्रकारांत पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली. 


जिल्हास्तरीय स्पर्धेतील हॉलीबॉल, बास्केट बॉल, टेबल टेनिस, कॅरम एकेरी, कॅरम दुहेरी, बॅडमिंटन, थाळीफेक, 400 मीटर धावणे, भालाफेक अशा विविध क्रीडा प्रकारात अकोले च्या स्पर्धकांनी यश संपादन केले.

तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेते हॉलीबॉल संघात रवींद्र सोनवणे (कॅप्टन), सुरज चव्हाण, शेलार सर, बांबळे भाऊसाहेब, लोहकरे भारत, संतोष देशमुख या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात अंतिम विजेता संघ ठरला. 

सर्व यशस्वी स्पर्धकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अकोलेचे गटविकास अधिकारी अमर माने, कृ.वि.अधिकारी विकास चौरे आदींनी कौतुक केले.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed