{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

एकविराच्या वतीने रंगणार महिला क्रिकेटचा थरार

संगमनेर । झुंझार न्यूज

महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील महिला व युवतींच्या सबलीकरणाकरता एकविरा फाउंडेशन च्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. येत्या 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात  7 मार्च ते 12 मार्च 2026 या कालावधीमध्ये भव्य महिला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, रस्सीखेच व बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती एकविराच्या संस्थापक अध्यक्षा कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने एकविरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित विविध स्पर्धां बाबत अधिक माहिती देताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की,सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एकविरा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी महिला स्पर्धांचे आयोजन होत असते. मागील 4 वर्षापासून होणाऱ्या या स्पर्धांमध्ये शहर व तालुक्यातील आणि बाहेरील शेकडो महिलांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. शालेय विद्यार्थिनी ते 65 वर्षांच्या आजींचा सहभाग असलेल्या या स्पर्धा राज्यस्तरावर लौकिकास्पद ठरल्या आहे.

देशात महिला क्रिकेट अत्यंत लोकप्रिय ठरत असून भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून महिला क्रिकेटला अधिक बळकटी दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुलींमध्ये ही महिला क्रिकेटची प्रचंड लोकप्रियता झाली आहे.

यावर्षी शनिवार 7 मार्च ते 12 मार्च 2026 या काळात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, रस्सीखेच स्पर्धा व बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी लहान गट इयत्ता पहिली ते दहावी, मध्यम गट अकरावी ते पदवी आणि खुला गट असे तीन विभाग करण्यात आले आहेत.

तिन्ही गटातील क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेसाठी पहिले बक्षीस 11100 रुपये व ट्रॉफी, द्वितीय बक्षीस 7 000 रुपये व ट्रॉफी आणि तृतीय बक्षीस 5000 रुपये व ट्रॉफी असे देण्यात येणार आहे. तर बॅडमिंटन स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय व तृतीय असे रोख व सन्मानचिन्हसह वैयक्तिक बक्षिसे दिले जाणार आहेत.

या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार 7 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचे मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे,आमदार सत्यजित तांबे,सौ.कांचनताई थोरात,सौ.दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, आयोजक डॉ.जयश्रीताई थोरात यांसह संगमनेर शहरातील विविध मान्यवर महिलांच्या उपस्थितीत होणार आहे.

एकविरा फाउंडेशनच्या वतीने या स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात येत असून तालुक्यातील अनेक संघ सहभागी झाले आहेत. तसेच यामधील अधिक सहभागी होण्यासाठी महिला व युवतींनी यशोधन कार्यालय व 7057037037 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन एकविरा फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed