महायुती कार्यकर्त्यांकडून नवसपूर्ती; हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कानिफनाथ महाराज यात्रोत्सवाच्या निमित्त शिवसेना युवासेना आणि महायुती कार्यकर्त्यांकडून आमदार अमोल खताळ यांच्या वजनाएवढे लाडू अर्पण करून लाडू तुला” करण्यात आली.

 

घुलेवाडी येथील महायुती कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार खताळ यांना मोठ्या मता धिक्याने विजयी करण्यासाठी कानिफनाथ महाराजांना नवस केला होता. तो नवस पूर्ण झाल्यानंतर कानिफनाथ महाराज यात्रोत्सवाचे औचित्य साधून हा आमदार खताळ यांना वजन काट्यात बसवून त्यांच्या वजनाएवढे लाडू ठेवण्यात आले .या लाडूतुला कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. कानिफनाथ महाराज की जय” च्या घोषणांनी वातावरण भक्तिमय झाले होते. कार्यक्रमानंतर हे लाडू उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले.

 

यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वैशाली राऊत, शिवसेना शाखाप्रमुख शरद्द पानसरे, सिताराम पानसरे, स्वरूप राऊत, स्वप्निल राऊत, संजय पानसरे, राजश्री वाकचौरे, सारंगधर पानसरे, कैलास काशीद, बाळासाहेब राऊत, सतीश भेंडाळे, ओंकार राऊत, विकास राऊत, शुभम सातपुते, विशाल फटांगरे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते तसेच घुलेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

जनतेने दिलेल्या अपार प्रेम, विश्वास आणि पाठिंब्यामुळेच मला संगमनेर तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची अमूल्य संधी मिळाली आहे. ही जबाबदारी माझ्यासाठी केवळ पद नसून, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे एक मोठे कर्तव्य आहे. तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे, प्रत्येक घटकापर्यंत प्रगती पोहोचवणे आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेच माझे मुख्य ध्येय आहे.
घुलेवाडीकरांनी केलेला सन्मान आणि दाखवलेले प्रेम हे माझ्यासाठी प्रेरणादायी असून, यामुळे मला अधिक जोमाने आणि निष्ठेने काम करण्याची ऊर्जा मिळते.

 

 

– अमोल खताळ (आमदार)
……………………………………….

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *