आश्वी । झुंझार न्यूज
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून मालुंजे येथे भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर’, ‘भिमशक्ती तरुण मित्र मंडळ’ आणि ‘समस्त ग्रामस्थ मालुंजे’ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक ३० एप्रिल रोजी सायंकाळी ४:०० वाजता ही भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने आमदार अमोलभाऊ खताळ, संरपच सौ. सुवर्णा संदीप घुगे, श्री. दिलीप तबाजी मुन्तोडे, श्री. आशिष शेळके, श्री. वाय.एल. मुन्तोडे आणि श्री. बी.एस. मुन्तोडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

यासोबतच श्री. रोहिदास होशिराम मुन्तोडे, श्री. संदीप भाऊसाहेब घुगे, श्री. गोकुळभाऊ दिघे, श्री. पप्पुभाऊ बनसोडे, श्री. राजु चिमाजी मुन्तोडे, श्री. अशोक गायकवाड आणि श्री. कैलास कासार यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावर्षीची जयंती विशेष लक्षवेधी ठरवण्यासाठी मंडळाने जय्यत तयारी केली आहे. मिरवणुकीमध्ये खालील आकर्षणे असतील:
अमृतवर्षा ऑर्केस्ट्रा: भक्ती आणि प्रबोधनात्मक गाण्यांची मेजवानी.
DJ विघ्नहर्ता: तरुणाईच्या उत्साहासाठी भव्य डीजे सिस्टीम.
फटाक्यांची आतिषबाजी: आकाशात रंगांची उधळण करणारी भव्य आतिषबाजी.

भिमशक्ती तरुण मित्र मंडळ व समस्त मालुंजे ग्रामस्थांच्या वतीने या ऐतिहासिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे मालुंजे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व भीमभक्त मिरवणुकीची आतुरतेने वाट पाहत आहेत.
