हक्काचे पाणी आणि 11 तास वीज मिळावी
थोरात कारखान्याच्या वतीने ऊस विकास मेळावा
संगमनेर । झुंझार न्यूज
दूध व ऊस हे शाश्वत उत्पादन देणारे पीक आहेत. त्यांना जपले पाहिजे साखर व्यवसाय सध्या अडचणीत असून निर्यात थांबली आहे. साखर कारखान्यांमध्ये खाजगींची संख्या वाढत असून स्पर्धा वाढली आहे. अशा काळात उसाचे क्षेत्र वाढवण्याबरोबर उसाची उत्पादकता एकरी 100 टन करावी असे आवाहन माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून तालुक्याच्या हक्काचे पाणी व रोटेशन काळात 11 तास वीज मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
जोर्वे येथील शिव ओंकार लॉन्स येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ऊस विकास वाढ मेळाव्यात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर मा आ डॉ सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग, पांडुरंग पाटील घुले, मृदा शास्त्रज्ञ डॉ अभिनंदन पाटील, बुवाजी बाबा पुणेकर, शरद दादा थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, बाबासाहेब ओहोळ, गणपतराव सांगळे, रामदास पा. वाघ, ॲड रामदास शेजुळ, संचालक डॉ. तुषार दिघे ,सतीश वर्पे ,संपतराव गोडगे ,विनोद हासे, अरुण वाकचौरे, ॲड.रामदास धुळगंड, अंकुश ताजने ,विलास शिंदे, नवनाथ आरगडे ,योगेश भालेराव ,रामनाथ कुटे ,दिलीप नागरे ,विजय राहणे, सुरेश थोरात, नवनाथ आंधळे, नाना शहाजी दिघे, संपतराव थोरात, नानासाहेब शिंदे, सौ मीनाक्षी थोरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे कृषी अधिकारी भाऊसाहेब खर्डे , कृष्णा दिघे,शेतकी अधिकारी बाळासाहेब सोनवणे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, केंद्र सरकारने निर्यात थांबवली आहे त्यामुळे साखर व्यवसाय अडचणीत आला आहे. साखर कारखानदारी अडचणीत आली तर अर्थव्यवस्था कोलमडेल. खाजगी कारखान्याची संख्या वाढली आहे. अनेक कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. अशा काळामध्ये मोठी स्पर्धा वाढली आहे. आपल्या कारखान्यात अल्कोहोल वीज निर्मिती काटकसर योग्य वेळी योग्य निर्णय यामुळे चांगली वाटचाल सुरू आहे.

दुष्काळी भागासाठी आपण निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सुरू आहे. उसाचे क्षेत्र वाढवण्याबरोबर एकरी उत्पादकता वाढवली पाहिजे. याचबरोबर रोटेशन सुरू असताना 11 तास वीज मिळाली पाहिजे. अकरा तास वीज हा न्यायालयाचा निर्णय आहे. मात्र आता फक्त पाच ते सहा तास लाईट मिळत आहे तरी सर्वजण गप्प आहेत. त्यासाठी सर्वांनी एकत्र या. तालुक्याला हक्काचे पाणी आणि वीज मिळालीच पाहिजे अशी मागणी करताना.

धर्माच्या नावावर राजकारण सुरू असून अनेक भूलथापांमुळे मूळ विषयांकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

तर डॉ अशोक कडलग म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी ऑस्ट्रेलियाच्या शिष्टमंडळात सहकारातील जाणकार नेते बाळासाहेब थोरात व राजेश टोपे यांची निवड केली. या क्षेत्रातील ते अनुभवी असून ऑस्ट्रेलियातील संशोधनाचा फायदा आपल्या विभागाला व्हावा याकरता त्यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील मातीचे परीक्षण करून घेणे गरजेचे असून कंपोस्ट खत गांडूळ खत शेणखत यांसह रोपांची लागवड करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपण एकरी उत्पादन वाढू शकतो. याचबरोबर या काळात येणारे भुंगेरे कमी करण्याकरता नवीन तंत्रज्ञानाच्या टिप्स त्यांनी सांगितल्या.

मा आ डॉ सुधीर तांबे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरच्या सहकार समृद्ध असून कारखान्याची चांगली वाटचाल सुरू आहे. कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस उत्पादन होण्याकरता या ऊस विकास मेळाव्यांचा लाभ होणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मृदा शास्त्रज्ञ डॉ अभिनंदन पाटील यांनी माती परीक्षण सेंद्रिय खत ठिबक सिंचन फायदे याविषयी माहिती दिली. यावेळी अनिल थोरात, नामदेव शिंदे ,सुभाष जगन्नाथ थोरात, मीनानाथ वर्पे, शिवाजी जगताप, यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हा. चेअरमन पांडुरंग पा. घुले यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी सभासद ऊस उत्पादक युवक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकरी 100 टन उत्पादन हे उद्दिष्ट
थोरात सह साखर कारखान्यावर सभासद, शेतकरी आणि कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचाही मोठा विश्वास आहे. आपण सातत्याने चांगला भाव दिला असून ऊस उत्पादकांचे हित जपले आहे. आगामी काळामध्ये आपल्या कार्यक्षेत्रात ऊस क्षेत्र वाढवण्याबरोबर एकरी 100 टन उत्पादन झाले पाहिजे याकरता 100 टन ऊस उत्पादन हे प्रत्येक शेतकऱ्याचे उद्दिष्ट असले पाहिजे याकरता कारखान्याच्या कृषी व ऊस विकास विभागाची मदत होईल असे कारखान्याचे मार्गदर्शक माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

