आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे गुरुकृपा कृषी सेवा केंद्राच्या वतीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोदरेज ॲग्रोव्हेट कंपनीच्या ‘हिटविड मॅक्स’ या निवडक तणनाशकाबाबत विशेष चर्चासत्र आणि मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी कापूस पिकावरील तण नियंत्रण आणि उत्पादन वाढीबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या चर्चासत्रात गोदरेज ॲग्रोव्हेटचे एरिया मॅनेजर मंगेश भोसले यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी ‘हिटविड मॅक्स’ या तणनाशकाचा वापर केल्यामुळे कापूस पिकाचे तणांपासून संरक्षण होऊन उत्पादनात कशी वाढ होते, यावर सविस्तर प्रकाश टाकला. तसेच, तणनाशकाचे फायदे-तोटे सांगतानाच बदलत्या हवामानाचा पिकावर होणारा परिणाम आणि अशा परिस्थितीत पिकाची घ्यायची काळजी यावरही त्यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले.

‘हिटविड मॅक्स’ या तणनाशकाचा प्रत्यक्ष प्रभाव आणि रिझल्ट शेतकऱ्यांना स्वतः पाहता यावा, यासाठी या कार्यक्रमात १० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. या निवडक शेतकऱ्यांना नमुन्याकरिता तणनाशक देऊन त्यांच्या शेतात प्रत्यक्ष ‘डेमो’ (प्रात्यक्षिक) आयोजित करण्यात आले आहेत.

या कार्यक्रमाप्रसंगी राजहंस दूध संघाचे संचालक विक्रमराजे थोरात, विनायकराव थोरात, सुभाष पवार, ऐननाथ जाधव, सोसायटीचे चेअरमन बबनराव कराड, रामनाथ पवार, भारत शेवाळे, नारायण जाधव, कारभारी जाधव, सोमनाथ जाधव, जीवन कदम, सूर्यभान थोरात, गोपाळ थोरात, संदीप थोरात, गुरुकृपा कृषी सेवा केंद्राचे संचालक अभिषेक थोरात , सुभाष बोंद्रे यांच्यासह परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटचे टेरिटरी मॅनेजर किरण संसारे, दीपक कदम, अनिकेत अभंग, संदेश शिरसाठ आणि अभिषेक थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तण व्यवस्थापनाबाबत मोठी जागरूकता निर्माण झाली आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *