{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

आश्वी । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथील ग्रामविकासाचा कणा समजल्या जाणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली. यामध्ये संस्थेच्या चेअरमनपदी भाऊसाहेब कारभारी सानप यांची, तर व्हाईस चेअरमनपदी राहुल तुळशिराम खेमनर यांची बहुमताने निवड करण्यात आली.

सहकार विभागाच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार विभागाचे वाकचौरे यांनी कामकाज पाहिले.


चेअरमन पदासाठी भाऊसाहेब कारभारी सानप यांचे नाव अमृता भिवाजी खेमनर यांनी सूचक म्हणून मांडले, तर त्यास सतीश तुळशिराम खेमनर यांनी अनुमोदक म्हणून पाठिंबा दिला. तसेच, व्हाईस चेअरमन पदासाठी राहुल तुळशिराम खेमनर यांचे नाव माधव मुरलीधर खेमनर यांनी सुचविले आणि त्यास पोपट दिवेकर यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध घोषित करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित व्हा.चेअरमन राहुल खेमनर म्हणाले की, “संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील आणि पारदर्शक कारभार करून सोसायटीला प्रगतीपथावर नेण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

यावेळी सोसायटीचे सर्व संचालक, सचिव, ग्रामस्थ सभासद
 मोठ्या संख्येने  उपस्थित होते. या निवडीबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात , आमदार सत्यजीत तांबे , राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह देशमुख यांच्यासह सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले . 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *