{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

झुंझार न्यूज । झरेकाठी

दुष्काळी परिस्थिती, घटलेले ऊस उत्पादन आणि पाणीटंचाई अशा प्रतिकूल परिस्थितीमुळे यंदाचा गळीत हंगाम साखर उद्योगासाठी आव्हानात्मक आहे. मात्र, संकटांवर मात करण्याची प्रवरा कारखान्याची ऐतिहासिक परंपरा असून, सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून यंदा १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण केले जाईल, असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरा येथे आयोजित बॉयलर अग्नीप्रदीपन व ऊस मोळी पूजन समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ मार्गदर्शक तथा माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

यावेळी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, व्हा. चेअरमन सोपानराव शिरसाठ, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे यांच्यासह संचालक, पदाधिकारी, सभासद, कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पाणी नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा ऊस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देतानाच शेतीसाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, आधुनिक तंत्रज्ञान आणि पाण्याचा काटेकोर वापर करून एकरी ऊस उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रवरा कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्याचा प्रयत्न

यंदाच्या गळीत हंगामापुढे नैसर्गिक परिस्थितीचे मोठे आव्हान असले, तरी कारखाना वेळेत सुरू करून पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी व्यवस्थापनाने नियोजन केले आहे. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास १२ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास ना. विखे पाटील यांनी व्यक्त केला.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी कारखाना वेळेत सुरू करण्यासाठी व्यवस्थापनाने केलेल्या नियोजनाचे कौतुक केले. पुढील वर्षी ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी कामगारांच्या परिश्रमांचे कौतुक करताना अहिल्यानगर जिल्ह्यात उच्चांकी गाळप आणि उच्चांकी साखर उतारा देणारा कारखाना म्हणून प्रवरा कारखान्याची कामगिरी कायम राखण्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरू असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संचालकांच्या हस्ते बॉयलरचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ऊसाच्या मोळीचे पूजन करून यंदाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *