{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

 

, महाराष्ट्राशी आणि विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्याशी घट्ट नाते असलेल्या नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली आहे. स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून त्या ३४९ सदस्यीय रिक्सदाग संसदेवर निवडून आल्या आहेत.

या ऐतिहासिक निवडीबद्दल आईला नगर जिल्ह्याची पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन केले आहे.

माध्यमांशी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले की, “आमच्या कुटुंबातील एक सदस्य एवढ्या मोठ्या पदावर निवडून जाणे ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे. या यशाचा आनंद आमच्या कुटुंबाबरोबरच संपूर्ण लोणी ग्रामस्थांनाही आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी स्वीडनमधील सामाजिक व राजकीय व्यवस्थेत सक्रिय राहून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये विखे पाटील कुटुंबाच्या सामाजिक आणि सार्वजनिक कार्याचा प्रभावही दिसून येतो.”

नीला विखे पाटील यांनी यापूर्वी स्टॉकहोम नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी म्हणून काम केले असून, स्वीडनच्या राजकीय क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. तसेच त्यांनी स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणूनही काम केले आहे. बालकल्याण आणि पर्यावरणाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून, याच अनुभवामुळे त्यांना संसदेत काम करण्यासाठी व्यापक पार्श्वभूमी मिळाली आहे.

“नीला विखे पाटील यांनी केलेल्या सामाजिक आणि राजकीय कार्याची पावती त्यांच्या या ऐतिहासिक यशातून मिळाली आहे. स्वीडनमधील नागरिकांच्या अपेक्षा त्या पूर्ण करतील, यासाठी त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा,” असेही ना. विखे पाटील यांनी सांगितले.

नीला विखे पाटील यांच्या या निवडीमुळे अहिल्यानगर आणि महाराष्ट्राशी संबंधित कुटुंबाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय उपस्थिती अधोरेखित झाली आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *