{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

झरेकाठी । झुंझार न्यूज

राहता तालुक्यातील गोगलगाव येथे पावसात पडलेल्या खंडामुळे खरीपातील बाजरी, मका, सोयाबीन, मुग व उडीद या पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झालेला दिसून येत आहे परिणामी पिकांच्या उत्पन्नामध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.शेतकरी मोठ्या प्रमाणात पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

पर्जन्यमान व खरीप 2026 च्या पीक परिस्थितीबाबत पाहणी करण्यासाठी आज अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी राहता तालुक्यातील गोगलगाव येथे भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांच्या समवेत , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी . सुधाकर बोराळे ,प्रांताधिकारी शिर्डी . माणिकराव आहेर ,तहसीलदार . अमोल मोरे , गटविकास अधिकारी श्री. गुंड, तालुका कृषी अधिकारी . आबासाहेब भोरे , मंडळ कृषी अधिकारी, लोणी . रमेश चोपडे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती शहाणे मॅडम यांनी भेट देऊन पिकाची पाहणी केली.

यावर्षी राहता तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक परिस्थिती, पाण्याची उपलब्धता व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *