दिल्ली : झुंजार न्यूज दिल्ली येथील केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांच्या शुभहस्ते यंदाचा बहुजन ग्रामविकास सेवा असोसिएशन संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय रत्न सन्मान 2023 पुरस्काराने अहदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील काकडवाडी गावचे निर्भिड पत्रकार व जनसंवाद चॅनलचे संपादक पत्रकार दत्तात्रय घोलप यांचा भारत सरकारच्या दिल्ली येथील पंचायत राज मंत्रालय राष्ट्रीय रत्न सन्मान 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदनशिव ठाकूर,जयराम पलसानिया,आदित्य उपाध्याय,सेवक नागवंशी,डॉक्टर नंदकुमार गोडगे रामनाथ बोऱ्हाडे,राहुल उके आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.सदर पुरस्कार सोहळ्यासाठी भारतातील 23 राज्यातील पुरस्कारार्थीउपस्थीत होते.पत्रकार दत्तात्रय घोलप यांना मिळालेल्या दिल्ली येथील राष्ट्रीय सन्मान पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

