आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक.!!

 

 

संगमनेर । झुंजार न्यूज 

 

 

संगमनेर तालुक्यातील काकडवाडी गावच्या शिरपेच्यात कासार परिवारातील कुमारी काव्या संदीप कासार हिने सुवर्णपदकाच्या रूपाने मानाचा तुरा रोवला आहे.काव्या कासार इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत असतानाच गेल्या दोन वर्षापासून कराटे प्रशिक्षण घेत होती.नुकत्याच नेपाळ देशात पार पडलेल्या मेयर कप 2025 आंतरराष्ट्रीय सामन्यात तिला भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला 11 व्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप कराटे फायटिंग स्पर्धेत तिला सुवर्णपदक आणि काथा स्पर्धेत काव्याला रौप्य पदक प्राप्त करून तिने देशाबरोबर संगमनेर तालुक्याचे गावाचे नाव मोठे केले आहे.

 

 

 

 

सदर स्पर्धेसाठी तिला चंचल स्पोर्ट अकॅडमी नाशिक, संगमनेर तालुक्यातील नान्नज गावाचे भूमिपुत्र तसेच स्पोर्ट शोतकोन कराटे डो.असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष,मुख्य प्रशिक्षक आनंद रोकडे,सविता रोकडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.यासाठी तिला संपूर्ण कासार परिवार तसेच काकडवाडी ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळाला होता.तिने मिळवलेल्या सुवर्णपदकाबद्दल तिचे काकडवाडी ग्रामस्थांकडून अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *