संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर येथील अमृता उत्तम जोंधळे वय वर्ष 8 हिने गोव्यामध्ये झालेल्या आरबी समुद्रात एक किलोमीटर स्विमिंग स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावला आहे.

गोव्यामध्ये झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्विमिंग स्पर्धेत सुमारे २५ राज्यांनी सहभाग घेतला होता. त्यात संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर गावातील अमृता उत्तम जोंधळे हिने दहा वर्षे वयोगटांमधील एक किलोमीटर स्विमिंग स्पर्धेत सदर अंतर सत्तावीस मिनिटात पूर्ण करत चौथा क्रमांक पटकावला आहे. याबद्दल तिला तेथे मेडल आणि सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले आहे. अमृता जोंधळे हिने मिळवलेल्या या यशाबद्दल कवठे कमळेश्वर सह पंचक्रोशीतील सर्व गावातून तिचे कौतुक होत आहे. अमृताने संगमनेर तालुक्याचे व कौठे कमळेश्वर गावाचे नाव देश पातळीवर गाजवले असल्याने तिचे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

अमृता जोंधळे हिच्या या यशाबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, बचत गटाच्या सौ सुनीता कांदळकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.
