संगमनेर । झुंजार न्यूज

 

 

माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण शिक्षण असणाऱ्या अमृतवाहिनी मॉडेल स्कूल चा माजी विद्यार्थी ऋषिकेश राजेंद्र गायकवाड यांनी यूपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले असून अमृतवाहिनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

 

 

 

Oplus_131072

अमृतवाहिनी मॉडेल स्कूल हे गुणवत्तापूर्ण इंग्रजी शिक्षणाचे केंद्र आहे . या स्कूलचे अनेक विद्यार्थी देशात व परदेशात विविध मोठ्या पदांवर काम करत आहे तसेच अनेक विद्यार्थी हे प्रशासकीय सेवेमध्ये आपली सेवा देत आहे. अमृतवाहिनी मॉडेल स्कूलचा माजी विद्यार्थी असलेला व आश्वी बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या ऋषिकेश राजेंद्र गायकवाड यांनी यूपीएससी परीक्षेत देशात 610 क्रमांक मिळवला आहे. हे यश संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे म्हणून ऋषिकेश गायकवाड याचा अमृतवाहिनी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त देशमुख यांनी सत्कार केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,  स्कूलच्या प्रभारी प्राचार्य श्रीमती शोभा हजारे, डॉ.जे बी गुरव, डॉ एम ए वेंकटेश, डॉ मनोज शिरभाते ,डॉ. राजेंद्र वाघ डॉ. बाबासाहेब लोंढे, डॉ.मच्छिंद्र चव्हाण, विलास भाटे आदींसह अमृतवाहिनी मॉडेल स्कूलचे शिक्षक विविध प्राचार्य उपस्थित होते.

 

 

 

Oplus_131072

 

यावेळी बोलताना सौ शरयू ताई देशमुख म्हणाल्या की अमृतवाहिनी संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांनी  एमपीएससी व यूपीएससीच्या परीक्षेमध्ये मोठे यश मिळवले असून हे संस्थेसाठी अभिमानास्पद आहे त्याचप्रमाणे संस्थेतील इतर विभागांमधील अनेक विद्यार्थी देशात व परदेशात मोठ्या पदांवर चांगल्या पॅकेजवर कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याने त्यांचे कुटुंब समृद्ध होते आणि याचा कायम अभिमान संस्थेला आहे.

 

 

 

Oplus_131072

 

तर ऋषिकेश गायकवाड म्हणाला की 2012-13 या शैक्षणिक वर्षांमध्ये मी अमृतवाहिनी मॉडेल स्कूल मधून शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालो. प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा मॉडेल स्कूल मधूनच निर्माण झाली यासाठी माझ्या शिक्षकांनी मला सातत्याने प्रेरणा दिली. ग्रामीण भागात असूनही इंग्रजी आणि इतर ज्ञान सातत्याने मिळवत गेल्याने मलाही यश मिळाले. यामध्ये संस्थेचा आई-वडिलांचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी हितेश राजपाल, दीपिका तांगडकर, परवेश शेख यांनीदेखील यूपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.

 

 

 

Oplus_131072

ऋषिकेश गायकवाड यांच्या यशाबद्दल माजी शिक्षण मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष लोकनेते बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्थ सौ .शरयू ताई देशमुख, बाळासाहेब पाटील गुंजाळ, सौ दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे ,डॉ.जयश्रीताई थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी अभिनंदन केले आहे

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *