युपीएसी परिक्षा उत्तीर्ण होत दिली आपल्या आईला अनोखी श्रध्दांजली !
आश्वी । झुंजार न्यूज
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिल्ह्यातील उमेदवारांनी यशाला गवसणी घातली आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील एका सेवानिवृत्त ग्रामसेवकाच्या मुलाने यूपीएससी परीक्षेत यश मिळवत संगमनेर तालुक्यात तो एकमेव उत्तीर्ण झाला आहे.

२०२४ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक राजेंद बाळकृष्ण गायकवाड यांचा मुलगा ऋुषीकेश राजेंद्र गायकवाड याने यश मिळविले.

११३२ पदांसाठी ही प्रक्रिया राबवण्यात आली. ऋुषीकेशने ६१० वा क्रमांक मिळवत या परीक्षेत चौथ्या प्रयन्तात यश मिळविले चार वर्षांपासून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता ऋषीकेशचे प्राथमिक शिक्षण विद्या विकास पब्लिक स्कुल बाभळेश्वर येथे तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण अमृतवाहीनी मॉडेल स्कुल सह्याद्री ज्युनिअर कॉलेज संगमनेर येथे तर बीएससी फरगुसन कॉलेज पुणे येथे पुर्ण केले ऋुषीकेशचा परिवार शिक्षित असुन आजोबा कै. बाळकृष्ण गायकवाड आजी कै.कुसुम गायकवाड वडील सेवानिवृत ग्रामविकास अधिकारी बहीण सौ. सुजल दाजी मंदार मामा भाऊ प्रतिक यांच्याकडुन प्रेरणा व पाटबळ मिळाले

तर आई कै. सुनिता गायकवाड हया कृषी सहाय्यक होत्या दुदैवाने त्यांचे पाच वर्षापुर्वी अपघाती निधन झाले मात्र त्यांचे स्वप्न होते कि ऋषीकेशने स्पर्धा परीक्षा देऊन उच्च पदावर जावे हे स्वप्न उराशी बाळगून त्यांने आईच्या जागेवर अनुकंपावर कृषी सहाय्यक नोकरी करत गेली चार वर्षे दररोज चौदा तास अभ्यासात स्वतःला झोकून दिले मित्र नातलग यांची साथ लाभत गेली आणि पुणे येथे दोन वर्ष खाजगी संस्थेत अभ्यास केल्यानंतर दिल्ली येथे दोन वर्ष अभ्यास केला पुणे येथील राहीलेल्या अभ्यासाच्या उणिवा दिल्ली येथे दुर होत गेल्या आईचे स्वप्न कुटुंबाची साथ आत्मविश्वास सातत्याने केलेल्या अभ्यासाने चौथ्या प्रयत्नात हे यश संपादित केले

तर भविष्यात पुन्हा परिक्षा देऊन आय ऐ एस होणार असल्याचे गौरव उदगार ऋषीकेशने गावच्या सत्काराला उत्तर देताने काढले तर आजच्या तरुणांनी स्पर्धा परिक्षेच्या तयारीकडे लक्ष देऊन उच्च पदावर जाण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे असे सांगत सर्वांचे मनापासुन आभार मानले.
