{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

कळसपिंपरी गावातील भेटीने ग्रामस्थांना दिला नवा विश्वास

 

पाथर्डी । झुंझार न्यूज 

 

दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी कुटुंबांच्या घरातील दिवाळीचा आनंद काहीसा हिरावला गेला आहे. शेतातील उभ्या पिकांची चिंता, पाण्याची टंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि आर्थिक विवंचना अशा अनेक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भिवसेन शंकर भवार या शेतकऱ्याच्या घरी दिवाळीचा सण साजरा करून पिठल भाकरीच जेवण केले.संकटाच्या प्रसंगी सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास देण्यासाठी आलो असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.

मंत्री विखे पाटील यांनी कळसपिंपरी येथील ग्रमास्थांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समाजावून घेतले.लहान मुलांना मिठाई आणि फटक्याचे वाटप केले. उपस्थित महीला युवक यांची आस्थेने चौकशी करून त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत अधिकार्यांना सूचना केल्या. आ.मोनिका राजळे यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गावातील भवार कुटुंबियांच्या घरी मंत्री विखे पाटील यांनी पणती पेटवून दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत केला. पारंपारीक पध्दतीने मंत्री विखे पाटील यांचे औक्षण केले.सोबत आणलेले कपडे मिठाई त्यांनी लाडक्या बहीणीला दिली.मुलांच्या शिक्षणा बरोबरच शेती व्यवस्यायाची माहीती जाणून घेतली.भवार कुटूंबियांनी केलेल्या पिठल भाकरीच जेवण मंत्री विखे पाटील यांनी सर्व सोपस्कार बाजूला ठेवत जमीनीवर बसून घेतले.

दुष्काळाची दाहकता लक्षात घेवून राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्याना पाच हजार रूपयांची अग्रीम मदत बॅक खात्यात वर्ग केली.यापुर्वी कर्जमाफीचा ऐतिहसिक निर्णय घेतला.अनेक वर्ष थकलेले वीजबील माफ केल्याची माहीती देवून हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.मुख्यमंत्र्यासह सरकार मधील आम्ही सर्व मंत्री या संकटात तुमच्या समवेत आहोत हा विश्वास देण्यासाठी आलो असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

गावातील पाणी समस्येबाबत त्यांनी ग्रामस्थांसमोरच जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दूरध्वनी वरून सूचना देवून पाणी योजनेवर फिल्टर प्लॅन्ट बसविण्याच्या सूचना दिल्या.चारा उत्पादना बाबत प्रशासकीय स्तरावर सर्व नियोजन झाले असून शासन शेतकऱ्यांच्या मदतीत कुठेही कमी पडणार नसल्याची हमी मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.@all

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *