{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

राज्यात दुष्काळाची तीव्र परिस्थिती निर्माण झाली असून, पावसाअभावी शेतकऱ्यासह पशुधनापुढेही चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. जनावरांना पुरेसा चारा मिळणे कठीण झाले असताना एका तरुण शेतकऱ्याने माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील सावरगाव घुले येथील राजू रामभाऊ घुले यांनी वसुबारसेच्या दिवशी एक पिकअप भरून चारा बेल्हाळे येथील श्री जीवदया मंडळ पांजरापोळ गोशाळेला दान केला. त्यांच्या या दातृत्वाचे तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी सिनारे,सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कडू यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी मनापासून कौतुक केले. घुले सावरगाव घुले येथील तरुण शेतकरी असून, पठारभागातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे.

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीबरोबरच पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. घुले यांच्याकडे स्वतःची लहान-मोठी अशी जवळपास २० ते २५ जनावरे आहेत. स्वतःच्या जनावरांची जबाबदारी सांभाळतानाच गोशाळेतील जनावरांचाही विचार त्यांच्या मनात आला. दुष्काळामुळे गोशाळांनाही चारा उपलब्ध करणे जिकिरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत केवळ स्वतःच्या जनावरांचा विचार न करता गोशाळेतील मुक्या जनावरांची भूक भागविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पिकअप भरून चारा श्री जीवदया मंडळ पांजरापोळ गोशाळेला सुपूर्द केला. यावेळी सहायक आयुक्त, संगमनेर तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रदीप खेडेराव, सरपंच नामदेव घुले, नितीन घुले, बाळासाहेब घुले, गोपीनाथ घुले, सचिन घुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *