संगमनेर : झुंजार न्यूज                         संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य विज्ञान व संगणक शास्त्र महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग आणि जालना येथील जनाबाजी सुमन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या शैक्षणिक समुपदेशन आणि सहायता केंद्र यांच्या बरोबर सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मेमोरेन्डोम ऑफ अंडरस्टँडिंग अंतर्गत पाच वर्षाचा सामंजस्य करार करण्यात आला.                                                                               महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. राम पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या. डॉ  सुवर्णा घोलप ,उपप्राचार्य प्रा. देविदास दाभाडे,अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.गणेश शेळके, डॉ.सारिका रोहमारे यांनी मंठा ,जिल्हा -जालना येथील जनाबाजी सुमन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे शैक्षणिक समुपदेशन आणि सहाय्यता केंद्र या संस्थेशी महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाबरोबर पाच वर्षासाठी  करार केला. शैक्षणिक समुपदेशन आणि सहायता केंद्र मंठा,जालना  येथील संस्थेचे अध्यक्ष देविदास गोरे  यांनी या कामी सहकार्य केले. या  सामंजस्य करार प्रसंगी कॅम्पस डायरेक्टर डॉ.राम पवार, प्राचार्या डॉ  सुवर्णा घोलप, उपप्राचार्य प्रा. देविदास दाभाडे , अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. गणेश शेळके, डॉ.सारिका रोहमारे तसेच शैक्षणिक समुपदेशन आणि सहाय्यता केंद्र यांचे संचालक श्रीमती विजया बानगुडे पाटील  यांची प्रमुख उपस्थिती होती.या पाच वर्षाच्या करारा अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरील ऑनलाईन विद्यार्थी केंद्रित कार्यशाळा, फॅकल्टी स्टुडन्ट एक्सचेंज प्रोग्रॅम, वेबिनार व्याख्यानमाला, विविध विषयांवरील ऑनलाईन कोर्सेस, स्कॉलरशिप कोर्सेस, राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय ऑनलाइन चर्चासत्रे यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येतील . आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मदत होईल या उद्देशाने  हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.हा सामंजस्य करार केल्याबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *