संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सालाबाद प्रमाणे या वर्षी भैरवनाथ यात्रा मंगळवार दि .४ एप्रिल ते बुधवार दि ५ एप्रिल २०२३ रोजी दोन दिवसीय उत्सव साजरा होणार असून मंगळवारी दुपारी बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा उत्सव कमिटीनी दिली आहे .

सालाबाद प्रमाणे होणाऱ्या भैरवनाथ यात्रा उत्सव मंगळवार दि .४ एप्रिल २०२३ रोजी भैरवनाथ पालखी मिरवणुक , दुपारी २ वाजता पानोडी – शिबलापूर शिवावर घोडा – बैलगाडया शर्यती , सायंकाळी ९ मनोरंजन म्हणून वाजता काळू – बाळू तमाशा तर बुधवार दि ५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी हजऱ्याचा कार्यक्रम , ३ वाजता कुस्त्या स्पर्धा होणार आहे

तरी परिसरातील लोकांनी या यात्रा उत्सवात सहभागी होवून या उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे .

शिबलापूर हे चौफुलीचे गाव असून या गावाला एक ऐतिहासिक परंपरा आहे तरी परिसरातील लोकांनी होणार्या बैलगाड्या शर्यतासह सर्व कार्यक्रमात मनोभावे सहभागी व्हावे सुनिल तबाजी मुन्तोडे ( उपसंरपच , शिबलापूर )
