संगमनेर : झुंजार न्यूज
राहुरी तालुक्यातील धानोरे येथील कु ऋषिकश पांडूरंग दिघे यांनी बँकींग क्षेत्रात पहिल्याचं प्रयत्नात यश संपादन केल्याने त्यांची युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या कृषी क्षेत्र अधिकारी पदी निवड झाली .
कु. ऋषिकेश दिघे यांनी आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विदयानिकेतन मध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुर्ण करुन पुढील शिक्षणाकरिता नाशिक येथील कृषी महाविदयालय प्रवेश घेवून शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर बँकींग क्षेत्रात करिअर बनविण्याकरिता त्यांनी पुणे इन्स्टिट्युट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन ( आयबीपीएस ) या संस्थेतंर्गत घेण्यात आलेल्या आयबीपीएस एस ओ या बँकींगच्या परिक्षेची तयारी केली . जिद्दी व चिकाटीने मेहनत केल्याने पहिल्याचं प्रयत्नात ऋषिकेश उर्तीर्ण झाला . त्यांची युनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत बँक कृषी क्षेत्र अधिकारी पदी म्हणून निवड झाली .

या निवडीबद्दल महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , खा .डॉ सुजय विखे पाटील , सौ शालिनीताई विखे पाटील यांच्यासह ऋषिकेश दिघे यांचे धानोरे व परिसरातून लोकांनी , युवकांनीअभिनंदन केले. तर धानोरे येथील माजी प्राध्यापक पांडूरंग दिघे व ग्रा प सदस्या सौ प्रतिभाताई दिघे यांचा मुलगा असून सामाजिक कार्यकर्ते अंबादास दिघे यांचा पुतण्या आहे तर कोपरगाव पचायत समिती माजी सदस्य गंगाधर पा.धनवटे यांचे नातू आहे .
