संगमनेर : झुंजार न्यूज

वरवंडी सरपंच सौ. किरण गणेश गागरे या गेल्या दोन अडीच वर्षांपासून पदावर कार्यरत आहेत. या दरम्यान सर्व विकासकामे पारदर्शक, गुणवत्ता पूर्ण व्हावे या दृष्टीने सरपंच नेहमी प्रयत्नशील आहेत. प्रत्येक काम, मासिक मिटिंग, ग्रामसभा कायद्यान्वये स्वतःच्या अध्यक्षतेखाली घेऊन सर्व माहिती प्रत्येक ग्रामस्थापर्यंत पोहचवीण्याचा प्रयत्न केलेला आहे. निविदा, एस्टीमेट, MB, मंजूर निधी स्रोत, कामांची सुरुवात ते काम पूर्ण होई पर्यंत ची सर्व माहिती गावातील प्रत्येक ग्रामस्थाला आज असते. आज पर्यंत वरवंडी चा इतिहास पहिला तर सरपंच केवळ नामधारी ठेवला गेलेला. सर्व काम संबंधित पॅनल चे पुढारी च करत असत यामुळेच अनेक मंजूर पाण्याच्या योजना बारगळळ्या गेल्या, अनेक लाखो रुपयांचे भ्रष्टाचार यांच्या काळात झाले. या भ्रष्टाचार व भामट्या पुढऱ्यांना बाजूला सारून सरपंच पदाची धुरा स्वतः सांभाळत अडीच वर्षात अनेक विकासकामे, योजना गावात रबविल्याचे गावाला संपूर्ण तालुक्याला माहित आहे. याच पुढऱ्यांनी ठराविक 2-3 सदस्य यांना पुढे करून अविश्वास असल्याचा बाऊ केला, विशेष म्हणजे हे 2-3 सदस्य कधीही मासिक मिटिंग, ग्रामसभा यासाठी उपस्थित नसतात. हे उपस्थित राहत नाही म्हणजे मिटिंग व सभा होत नाहीत हा यांचा गैरसमज आहे. काही सदस्य यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यांचे पद कधीही बरखास्त होऊ शकते या भीतीने या सदस्यांचे पती नको ते आरोप करून स्वतः च पुढारी पण धोक्यात येऊ नये हा प्रयत्न करत आहे.

सरपंच यांनी केलेल्या कामासाठी जवळपास 75 टक्यापेक्षा अधिक सदस्य यांचा नेहमी पाठिंबा राहिलेला आहे व तो आजही कायम आहे. 2-3 सदस्य यांचे मत म्हणजे सर्व सदस्य यांचे मत नाही.

चौकट

एक महिला सरपंच असूनही ग्रामपंचायत गाव ते तालुका जिल्हा पातळी पर्यंत सर्व ग्रामपंचायत कामे मार्गी लावण्याचा मी कसोटीने प्रयत्न करत आहे. गावातील काही भ्रष्ट पुढऱ्यांना सरपंच पदाचे अधिकार हवे होते, ते न मिळाल्याने व त्यांच्या मर्जी नुसार कामे होत नसल्याने सरपंच यांना सतत अडचणीत आणण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न हा नेहमी चालू असतो, अशा प्रवृत्ती नकडे लक्ष न देता आम्ही आमचे विकासकामे चालू ठेवली आहेत, त्यांचे म्हणणे अविश्वासाचे असेल तर त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणावा, कायद्याने त्यांना तो अधिकार आहे, परंतु उगाच गावची व सरपंच यांची प्रतिमा मालिन करु नये. नेहमी विकासकामात जर कोणी समाज विघातक लोकांनी अडवणूक केली किंवा कामात अडथळा आणणे, बदनाम करणे असे षडयंत्र केल्यास अशा लोकांवर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यास कसूर केला जाणार नाही.

सौ. किरण गणेश गागरे.
सरपंच वरवंडी.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed