संगमनेर : झुंजार न्यूज
भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता व निमोनचे सरपंच संदीप भास्कर देशमुख यांनी भारतीय राजमुद्रेचे विटंबन केले असून याप्रकरणी तातडीने चौकशी करत त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रीय दलित पॅंथरच्या वतीने करण्यात आली आहे.
राष्ट्रीय दलित पँथरच्या वतीने संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक भगवान माथुरे व नायब तहसीलदार रमाकांत कडनोर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष राजू खरात, प्रवीण गायकवाड ,अमित चव्हाण, विजय पांढरे, रवींद्र गिरी, संतोष घेगडमल, प्रशांत घेगडमल,संदीप दळवी, सुनील रोकडे, उत्तम टपले, राजेंद्र आव्हाड, रवींद्र कानकाटे, प्रकाश वाघमारे आदी उपस्थित होते.

मात्र या विकृत प्रवृत्तीने अशा पद्धतीने राजमुद्रेचे विटंबन करून एक प्रकारे संविधानाचा अपमान केला आहे. हे वर्तन अत्यंत चुकीचे असून या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. सदर तरुणांनी केलेले हे गैरकृत्य एकदम चुकीचे व बेशिस्त आणि समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचे राजू खरात यांनी म्हटले आहे.
व दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी यावेळी राष्ट्रीय दलित पॅंथरणे केली असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा दलित पॅंथरच्या वतीने कडक आंदोलन छेडले जाईल व त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे.
