शिर्डी : झुंजार न्यूज

श्री साईबाबा संस्थानचे आउट सोर्स कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांना निवेदन देण्यात आले

यावेळी राज साहेब ठाकरे म्हणाले की या प्रकारांमध्ये पूर्ण लक्ष घालून योग्य ते न्याय मिळवून देण्याचे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शिर्डी शहराध्यक्ष उपतालुकाध्यक्ष प्रशांत वाकचौरे यांना दिले

शासनाचे उद्योग ऊर्जा कामगार विभागाचे सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या सर्व नगरपरिषद क्षेत्राचे समावेश झोन नंबर ०२ करण्यात आलेला आहे व शिर्डी नगरपरिषदेचा झोन नंबर ०२ समावेश झाल्याने श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिनांक ०१/०५/२०२२ पासून वेतन अधिनियम १९४८अंतर्गत शॉप अँड कमर्शिअल इस्टॅब्लिशमेट झोन नंबर ०२ प्रमाणे वेतन वाढ देणे बंधनकारक होते असे असताना आदेश काढले पण सारे कागदावरच राहिले ,हा १५०० ते १८०० कर्मचाऱ्यांचा प्रश्न असून त्यांना साधारणपणे दहा पासून सुधारित वेतन वाढ देण्यात आलेली नाही अद्याप पर्यंत झालेला पत्र व्यवहार याबाबतची सर्व माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्षमाननीय श्री राजसाहेब ठाकरे यांना देण्यात आलेली आहे

यावेळी शिर्डी शहराध्यक्ष लक्ष्मण अण्णा कोतकर जिल्हाप्रमुख राजेश लुटे तालुका अध्यक्ष गणेश जाधव अभिजीत पोपळघट प्रवीण आसणे किरण पगारे चेतन झिंजाड पदाधिकारी उपस्थित होते

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *