श्रीरामपूर | झुंजार न्यूज
कार्यकर्त्यानी समाज्यामध्ये सातत्य ठेवले तरचं पक्ष अथवा संघटना जीवंत राहून एक ताकद निर्माण होते रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन घेणे म्हणजे सामाजिक ऐक्य निर्माण होवून त्यातून कार्यकर्त्यामध्ये एक संजीवनी संचारल्याने भविष्यात होणाऱ्या निवडणुकीमधून आपले अस्थित्व तयार होत असल्याने शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनाची संधीचा फायदा घेवून तळागाळातील महीला – पुरुषांनी मोठ्या संख्येने अधिवेशानास यावे असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी केले .
श्रीरामपूर येथील शासकिय विश्रामगृह येथे जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिर्डी येथील अधिवेशन आढावा बैठक संप्रन्न झाली . याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे , जिल्हा विभाग प्रमुख भिमा बागुल , जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , चदकांत सरोदे , सुनिल शिरसाठ , महेंद्र त्रिभुवन , राजू नाना गायकवाड , विशाल सुरडकर , भाऊसाहेब खरात , राजू भाऊ मगर , विजय पवार , सतिष चक्रे , आयुब पठाण , अजय शिंदे , बाबासाहेब बनसोडे , रमेश अमोलिक , रितेष पवार , बाबासाहेब बनसोडे , बंडू सुतार , प्रदिप गायकवाड , इद्रजित गायकवाड , अदित्य बागुल , यश मगर , रोहित बागुल आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .
विजयराव वाकचौरे पुढे म्हणाले की , शिर्डी येथे रिपब्लिकन पक्षाचे सामाजिक ऐक्याच्या हेतुनचं अधिवेशन आहे यातुन समाज्याची ताकद वाढते , संध्याची परिस्थिती ही स्वत:चे अस्तित्व स्वता:नेच निर्माण करायचे त्यांना समाज्यात राजकारण करायचे त्यांनी लोकांपर्यत जाणे , संपर्क साधून संघटन करणे. कार्यकर्त्यानी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी वादाविवाद बाजूला ठेवून शक्ती प्रदर्शन करुन दाखवा सामाजिक न्याय हक्काकरिता स्वयंस्फुर्ती तयार व्हा ! . वाडा – कारखान्याच्या संदेशाची वाट पाहू नका . चळवळीतील कार्यकर्ते प्रामाणिक आहे नाराज होवू नका कार्यकर्त्यानी प्रयत्नशील असावे . बहुजन समाज्यातील हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे .
श्रीकांत भालेराव म्हणाले की , कार्यकर्त्यानी पदाचा आपेक्षा न ठेवता केवळ सामाजिक संघटन करा त्यातूनचं आपोआप पद मिळते . पक्षामध्ये पद घेवून संघटन होत नसल्याचे चित्र दिसत आहे ही मोठी शौकातिका आहे पक्षात प्रामाणिक काम करताना पगार नाही चळवळीत काम करणे हे मूळपिंड पाहिजेल संघटन बांधण्याचे काम केवळ रामदास आठवले यांचे आज देशात त्यांना तोड नाही . आठवले साहेबासारखे कार्यकर्त्यानी पक्षाचे संघटन केल्यास देशात रिपब्लिकन पक्ष एक नंबरचा दिसेल .
यावेळी राजाभाऊं कापसे , सुरेंद्र थोरात , महेंद्र त्रिभुवन आदीचे भाषणे झाली .

