शिर्डी : झुंजार न्यूज

 देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला मदत मिळेल त्याचा विकास होईल जनगणनेचा कोणत्याही धर्माशी संबंध जोडू नये . ही जाती जनगणा आकड्याकरिता झाली पाहिजेल असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली .

शिर्डी येथे महाअधिवेशन व राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीच्या त्यानिमित्ताने मीडियाशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी ही मागणी केली. याप्रसंगी माजी मंत्री अविनाश महातेकर , प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे , अॅड बी के बर्वे , नॉगालॅड आमदार ए लिमा वन चांग , लिमटिचाबा . चांग , प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , बाळासाहेब गायकवाड , राज्य सचिव दिपकराव गायकवाड , दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे , उत्तर जिल्हाध्यक्ष  सुरेंद्र थोरात , कैलास शेजवळ , सुनिल मोरे , नाना त्रिभूवन आदीसह पदाधिकारी व कार्यकर्त्य उपस्थित होते .

रामदास आठवले  पुढे म्हणाले की , जातीनिहाय जनगणना केल्यानंतर देशात कोणत्या जातींची लोकसंख्या किती आहे याची माहिती मिळेल. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. जनगणना आयोगाशीही मी बोलणार आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यास समाजातील प्रत्येक वर्गापर्यंत सरकारच्या योजना पोहोचण्यास मदतच मिळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं .  जे लोक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहेत, त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे, असं सांगतानाच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही. मात्र, सामाजिक न्यायासाठी ही मर्यादा ओलांडली पाहिजे, असंही ते म्हणाले. तर सरकारी प्रमाणे खाजगी क्षेत्रात एस सी / एस टी यांना आरक्षण मिळाले पाहिजेल . तसेच दलित भूमिहीनाना किमान ५ एकर जमीन शासनानी द्यावी . आरोग्य खात्यातील आशा स्वय सेविकांना वेतन द्यावा आदी मागणी पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे करणार आहोत  
काही राज्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कायदा बनविण्यावर भर दिला जात आहे. उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये नव्या लोकसंख्या धोरणावर जोर देण्यात आला आहे. दोन्ही राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन पेक्षा अधिक मुलं असतील तर त्यांना सरकारी योजनांपासून दूर ठेवण्यावरही भर दिला जात आहे. मात्र, सध्या हा निव्वळ चर्चेचा विषय असला तरी त्यातच आठवले यांच्या विधानाने भर टाकली आहे
उद्धव ठाकरे हे मनमिळाऊ व शांत स्वभावाचे आहे मात्र त्याच्या कडून भाजपाशी सलगी तोडल्याची मोठी चुक झाली . बहुतांश आमदाराना महाविकास आघाडीत जाण्यास विरोध होता .त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले . तरी पण ते माझे मित्र आहे त्यांनी पुन्हा भाजपाशी युती करावी वेळ अजून गेला नाही असे शेवटी आठवले म्हणाले
चौकट : १ 
२०२४ च्या निवडणुकामध्ये भाजपा निवडणुका जिंकून पूर्ण ताकदी सत्तेवर येणार आहे शिर्डी लोकसभेकरिता मी इच्छुक आहे याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा झाली आता अमित शहा , जी पी नड्डा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा राहीली लवकरचं तोडगा निघेल मात्र मला संधी दिल्यास मी निश्चित शिर्डीकरांशी प्रामाणिक राहून विकासात्मक कामाना दिशा देणार !
रामदास आठवले ( केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री )
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *