राहाता / झुंजार न्यूज

संध्या गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणुक ही बाहेरील लोकांच्या खोडसेळपणामुळे लागली असून सभासदानी या बाहेर लोकांवर विश्वास ठेवू नये या ठिकाणी जावई लेकीला पाठवतील या येणाऱ्या पार्सलला बाहेरच्या बाहेर सभासदानी पाठवून द्यावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव सचिन शिदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्रारे केले आहे 

प्रसिद्धी पत्रकात सचिन शिंदे पुढआ म्हणाले की , आपल्या गणेश सहकारी कारखान्याची निवडणूक ही जाणून बुजुन लावण्यात आली आहे प्रत्येक्षात ही निवडणूक लोकांमध्ये संभ्रम करण्यास लादली गेलेली आहे. संगमनेरचे लोक इकडे येऊन कारखान्याच्या उलट – सुलट गप्पा मारतात त्यांचे सभासद किती त्यांचे गणेश कारखान्यासाठी योगदान काय ? ज्यांनी आपल्या तालुक्यातील सहकारी संस्था मध्ये आपले नातेवाईक बसून खासगीकरण करण्याचे काम चालवले तसेच आपल्या कारखाना परिसरातील ऊस ठराविक वेळ होऊन देखील तुटत नाही उसाच्या खोडक्या होतात ते लोक गणेश कारखाना चालवायला निघाले म्हणजेच त्यांना इथे पण आपला एखादा भाऊ, जावई का मुलगी यांना बसवायचे आहेत का? त्यांचे प्रपंच करून गणेश कारखाना बंद पडून घोटी सारख्या परिसरात स्थलांतरित करायचा आहे का? हा डाव साधण्याचा खरंच प्रयत्न चालू आहे का ? आपल्या कारखान्यातील हजारो साखर पोत्यांची मध्यंतरी चोरी झाली ती खरोखर चोरी होती का, किंवा गाडी पंक्चर झाल्यामुळे डाव फसला हे पण लक्षात आले पाहिजे कारण येवढ्या पोत्यांची चोरी होणे शक्य नाही. साहेब तो तपास कुठ पर्यंत आला साखरेच्या गाड्या पकडल्या गेल्या परंतु चोरी करणाऱ्या आरोपींचे नवे उघड झालेली नाही ही पण  एक शोकांतिकाच असो मित्रानो ज्या आपल्या कारखान्यास या पूर्वी जिल्हा बँकेचे कर्ज देऊन कारखाना सुरू करण्यास ज्यांनी विरोध केला तेच लोक आता कारखाना वाचवण्याचा वल्गना करत आहेत तरी पण सुज्ञ नागरिकांनी व मतदारांनो अशा विकृत कोल्हा कुत्र्यांचा बंदोबस्त आपणच करावा व परत हे लोक या परिसरात सहकार मोडण्यासाठी फिरकणार नाही याची काळजी आपणच घ्यावी असे आवाहन शिदे यांनी केले आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *