संगमनेर / झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज शिक्षण प्रसारक संस्थेचे मल्हरराव होळकर माध्यमिक उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेज इमारतीसाठी विद्यालय ज्युनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी पाराजी खेमनर सध्या रयत शिक्षण संस्थेत प्रवरा नगर येथील माध्यमिक विद्यालयात आदर्श शिक्षक म्हणुन कार्यरत आहे.आपल्या गावच्या विदयार्थी घडविणाऱ्या शाळेची इमारतीची दुर्दशा बघून त्यांचे मन खिन्न झाले त्याच क्षणी इमारतीकरित आर्थिक मदत करत आपल्या सहकार्यानाही मदत करण्याचे आवाहन केले .

येथील घडलेले विदयार्थी ज्ञानदानाचे काम करत आहे . तरी देखील शाळेची ही दुर्लक्षितपणा त्यात कोणताही बदल नाही. निकालाची परंपरा कायम गुणवत्ता पूर्वक उत्तम दर्जाची टिकून ठेवण्यात आजपर्यंत शिक्षक ,शिक्षिका ,या सर्वांचे बहुमोल योगदान या शाळेला लाभले आहे.परंतू शाळेकडे गावातील आपलेच मुले याच शाळेतून उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर विराजमान होउन गावचे नाव उज्वल होणार आहे.त्यातून त्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम होउन शासकीय,केंद्र शासकीय सेवेत ,डॉक्टर्स ,इंजिनियर,वकील,उद्योजक घडविले आहेत.परंतू गावी आल्यानंतर शाळेकडे बघितले की विसरुन जातात की ,आज मी जेथे आहे माझी आर्थिक समृद्धि झाली ती याच शाळेतून मी शिक्षण घेऊन बाहेर पडलो यामागे हिच शाळा ,शाळेत असलेले असलेले गुणवंत शिक्षक ,यामुळे सर्व काही झाले.संस्था तालुक्यातील शाळा बघुन जी काही मदत करता येइल ती प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न नेहमी करतात ,याकामी अंभोरे गावचे भुमिपुत्र ,संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन मा.रणजितसिंह देशमुख (दादा) यांनी मा.आमदार बाळासाहेब थोरात साहेब,मा.आमदार डॉ.सुधिरजी तांबे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली गावातील असलेले धार्मिक मंदिरांचा जिर्नोध्दार केला काही विठ्ठल रुख्मिणी मंदीर दुरुस्ती, सुशोभिकरण केले,काळु आई मंदीर नव्हते ते सुंदर प्रकारे तयार करुण सभामंडपासह पुर्णात्वास जात आहे लवकरच मुर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे. गावातील असलेले सर्वच मंदीर यांना भरघोस अशी निधीची मदत करुन गावचे विकासासाठी बहुमोल सहकार्य लाभत आहे. सध्या गावात एका बाजूंने चाललेली विकासाची प्रगतीचा आलेख बघता गावात सुशोभिकरण झाले,बाजारपेठ फुलल्या परंतू ज्या ज्ञान रुपी मंदिरातून हा अमुलाग्र बदल झाला त्यात ज्ञान मंदीर शाळा आहे त्या ईमारतीत भरते.जवळ जवळ 45 ते 47 वर्ष झाले तरी शाळेच्या ईमरतिचे हे दृश्य आजही जशाचे तसे आहेत यात काही बदल होईल की नाही.अशी चिंता नेहमी सतावते म्हणुन नेतृत्वाकडून सर्वच अपेक्षा करणे हे योग्य नाही त्यांची साथ आपल्याला नेहमी असते परंतू गावचे सुजान नागरिक,युवक,माजी विद्यार्थी,भावी आधारस्तंभ म्हणुन भावी पिढीतील मुलांनी कुणाकडे बघावे असा प्रश्न निर्माण होतो हिच खंत मनाशी ठेवुन अंभोरे गावचे सर्वसामान्य कुटंबातील अगदी दुस-याचे इथे शेतीची सालकरु म्हणुन शेतीची कामे केली आणी प्रचंड मेहनत,कष्ट घेऊन स्वर्गीय पाराजी भिका खेमनर यांचा मुलगा श्री.रामदास पाराजी खेमनर याच शाळेतून आपल्या वडिलांच्या केलेल्या आदर्श संस्कार, कष्टावर शिक्षण पुर्ण केले आणी आज ते महाराष्ट्रातील नामंकित रयत शिक्षण संस्थेतील प्रवरा नगर येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणुन अध्यापनाचे कार्य प्रामाणिक पणे पार पडतात.अशा सर्वसामान्य कुटंबातील शिक्षक झाल्यानंतरही आपल्या शाळेबद्दलची भावना आदरयुक्त आहे तो सन्मान म्हणुन त्यांनी आपल्या कन्येचा विवाह दि.15/05/2023 रोजी संपन्न झाला त्या विवाह प्रसंगी त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या शाळेच्या नविन ईमारत बांधकामासाठी रुपये पाचहजार एक ची देणगी आर्थिक स्वरुपात जाहीर केली.अगदी मनापासून त्यांची शाळेविषयीची तळ मळ बघता गावात अनेक मंदीर उभारली गेली परंतू आजच्या पिढीतील मुलांवर आदर्श संस्कार खुप आवश्यक आहे.प्रथम गुरु आई -वडिल दुसरे गुरु ज्यांनी आपल्या संपुर्ण जिवन बदलविन्यासाठी अज्ञान रुपी अंधार दुर करनेसाठी ज्ञान रुपी अंधारातून प्रकाशाकडे प्रत्येकाला एक नविन जिवन जगण्याचा मार्ग दिला आदर्श संस्कार केले.तेच मंदीर दुर्लक्षित असेल तर गावात कितिही विकास झाला,गावातील युवक कितिही उंच शिखरावर,उच्च पदावर असला तरी त्याचा काय उपयोग?म्हणुन तर नविन मुलांना याच ज्ञान मंदिरातून आदर्श संस्कार देण्याचे काम गुरुजन वर्ग करित असतात तेच मंदीर जर स्वछ,सुंदर,मुलांच्या संरक्षणाची खात्री नसेल गावातील मंदीर कितिही सुंदर,आकर्षक निर्माण केले तरी त्या मंदिरात येणारा-जाणारा संस्कारक्षम असेलच असे नाही.मंदिराची पावित्र्यता टिकणार नाही.जर मंदिरात पावित्र्यता नसेल कोटी रुपये खर्च करुन निर्माण केलेले मंदीर कशासाठी? म्हणुन ज्ञानदान रुपी मंदिराचा अंधकार दुर करायचा असेल तर आज खरी गरज एवढे मोठे आपले गाव असतांना शाळेसाठी ईमारत उपलब्ध करु शकत नाही हे आपलं सर्वांचं दु:र्भाग्य समजा! हेच शाळेविषयी असलेली खंत मनाशी ठेउन श्री.रामदास पाराजी खेमनर सर यांनी एक युवकांना आदर्श घालुन दिला आहे.यांनी कन्येच्या विवाह प्रित्यर्थ मल्हरराव होळकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आणी ज्युनियर कॉलेज साठी रुपये पाच हजार एक सढळ हाताने मदत जाहीर केलेली (देणगी) देउन नविन होत असलेल्या शाळेच्या ईमारतीसाठी आर्थिक हातभार लावला ही मदत रोख स्वरुपात मल्हरराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य गायकवाड़ सर यांना अंभोरे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रावजी भागा खेमनर , रामदास पाराजी खेमनर यांचे शुभ हस्ते सुपूर्त करण्यात आली.

या प्रसंगी बबनराव सुभाजी खेमनर,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब रखमा खेमनर, अहिलाजी काशिनाथ जगनर, सोपानराव काशिनाथ खेमनर, बाबुराव कारभारी जगनर , हौशिराम सोर, सुभाषराव हळनोर आदीं उपस्थीत होते.

ही गोष्ट खरोखर कौतुकास पात्र आहे.अंभोरे ,डीग्रस ,मालुंजे,शेडगाव ,हंगेवाडी ,कनोली ,पिंपरणे , जाखोरी ,देवगांव ,शिरापूर ,कोळवाडे,या परिसरातील अनेक विद्यार्थी,विद्यार्थिनी,असे अनेक इतर विदयार्थी, या शाळेने मोठ मोठे अधिकारी ,पदाधिकारी,राजकिय नेते ,उद्योजक ,डॉक्टर्स , वकील ,इंजिनियर,कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी ,तलाठी ,आय.टी.इंजिनियर,कार्यकारी अभियंता ,प्रादेशिक परिवहन अधिकारी (आर.टी.ओ),प्राध्यापक, प्राचार्य,शिक्षक,व्यापारी व्यावसायिक,प्रगतशिल शेतकरी ,मंत्री ,आमदार,यांचे खाजगी सचिव, या शाळेतून निर्माण झाले यांना विनंती आहे की,आपण या उपक्रमाचे स्वागत करुन नविन होणा- या ज्ञान मंदीर (इमारत) कामी आर्थिक मदत करावी असे आवाहन येत आहे .

