कोपरगांव / झुंजार न्यूज

 कोपरगांव शहरातील अंबिकानगर परिसरात श्री साईधाम मंदिराचा चोवीसावा वर्धापनदिन शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थीतीत संपन्न झाला.
               
संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, संजीवनी उद्योग समूह अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी उपस्थीतांचे स्वागत केले, तर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख प.पू. रमेशगिरी महाराज व जंगलीदास माऊली यांच्या हस्ते माध्यान आरती करून प्रसादाचा महानैवेद्य दाखविण्यांत आला. 
         
 प. पू. धोंडीबाबा चव्हाण व साईबाबा मंदिरावर विद्युत रोशनाईसह फुलांची भव्य प्रमाणात सजावट करण्यांत आली. पहाटपासुनच विविध धार्मिक कार्यक्रमाने या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. हरिद्वार, काशि, द्वारका येथील साईभक्तांनी आणलेल्या पवित्र जलाबरोबरच प्रतीशिर्डी पुणे येथील उस्मानभाई यांच्या मातोश्री व मुलीने पवित्र हज यात्रा करून तेथून आणलेल्या जमजम नदीचे पवित्र जलच्या सहाय्याने साईबाबांच्या मूर्तीस ब्रम्हवृंदांच्या साक्षीने महामस्तकाभिषेक घालण्यांत आला. 
           
गोवा येथील साईभक्तांनी घुमट आरती, नागर पार्टी यांनी साईभजने, मध्यप्रदेशचे सुमीत पोंडा यांनी साईचरित्रकथा, हैद्राबाद, बंगलोर, महाराष्ट्र राज्य, गुजरात, दिल्ली, आदि विविध राज्यातील साईभक्तांनी भजनासह बहारदार कला सादर केली. प्रख्यात ड्रमवादक शिवामणी यांनी विदेशातून भ्रमणध्वनीच्या सहाय्याने साईधाम सोहळ्याचे सर्व क्षण डोळ्यात साठवले. 
         
 संगणकतज्ञ विजय नायडू, रोहित वाघ, नाना नवले, राजेंद्र शिंगी, साहेबराव मढवई, एकनाथ चव्हाण व चव्हाण कुटुंबियांसह सर्व साई भक्तांनी हा सोहळा यशस्वी करण्यांसाठी मोलाचे सहकार्य दिले.
           
याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या वतीने सुभाष आगळे, साईबाबा संस्थान शिर्डीचे माजी विश्वस्त, विविध साईभक्त, प्रति शिर्डी शिरगाव (पुणे) येथील अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे, अमेरिकेच्या साईभक्त अनिता नाईक व त्यांचा सर्व परिवार, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, उद्योजक डॉ. मुथा (पुणे), वसंतराव पिंपळे, सपनाताई घुले, थोरात उद्योग समूहाचे आबा थोरात, , माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, सौ. उमाताई विजय वहाडने, अहमदनगर जिल्हा पंचक्रोशीतील साईभक्त, अबाल वृद्ध, महिला भगिनी आदींनी साईबाबांचे मनोभावे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. साईभक्त प. पू. धोंडीबाबा चव्हाण यांच्या जीवन कार्यावर पुस्तक तयार करण्याचे काम सुरू असून त्यासाठी साई भक्तांनी आपले अनुभव लिखित स्वरूपात तातडीने साईधाम कडे जमा करावेत असे आवाहन सुरेश चव्हाण यांनी केले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *